शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात डिटेन्शन सेंटर उभारणार नाही - गृहमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 06:26 IST

नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत सुस्पष्टता नाही. त्यामुळे राज्यातील कोणत्याही जाती, धर्माच्या बांधवांनी घाबरण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

ठाणे : नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत सुस्पष्टता नाही. त्यामुळे राज्यातील कोणत्याही जाती, धर्माच्या बांधवांनी घाबरण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात डिटेन्शन सेंटरही उभारू देणार नसल्याची ग्वाही राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिली. काही मंडळी मुस्लिम बांधवांना शिवसेनेच्या जवळ जाऊ नका, असे सांगतात. मात्र, जोपर्यंत तुम्ही जवळ येणार नाहीत, तोपर्यंत शिवसेना काय आहे, हे तुम्हाला समजणार कसे, असेही त्यांनी यावेळी सांगत, मुस्लिम बांधवांना आम्ही तुमच्यासोबत होतो, आहोत आणि यापुढेही असणार, असे स्पष्ट केले.नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात ठाण्यातील मुस्लिम बांधव येत्या काही दिवसांत मोर्चा काढणार आहेत. परंतु, या मोर्चाच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शिंदे यांच्या मध्यस्थीने शनिवारी ठाण्यात रात्री एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत शिंदे यांनी कोणालाही घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सांगितले. या राज्यात कोणत्याही धर्माच्या, जातीच्या व्यक्तीला भय वाटणार नाही, असे निर्णय घेण्यासाठी हे सरकार बनले आहे. त्यामुळे ज्या दिवशी नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर करण्यात आला, त्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोणत्याही जाती, धर्माच्या लोकांना त्रास होणार नाही, असे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात सध्या सर्वोच्च न्यायालयात दावा सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने त्यांच्याकडून मुस्लिम समाजाला उचकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोणीही अशा अफवांवर विश्वास न ठेवता शांततेच्या मार्गाने आपली मते व्यक्त करावीत, असे शिंदे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी