डिप्प्पी वांकाणी, मुंबईबॉलीवूडमधील अभिनेते वरुण धवन, शक्ती कपूर आणि टायगर श्रॉफ यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या तोतया आयकर आयुक्ताला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली आहे. मुरली मांगीलाल मुंधेरा असे या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. हा तोतया अधिकारी आयकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांचे एक कथित सॉफ्टवेअरही मागील वर्षापासून वापरत होता. कार, मोबाईल आणि फर्निचरच्या खरेदीवर त्याने सूटही मिळविली होती. या तोतया आयटी अधिकाऱ्याने बॉलीवूडमधील काही कलाकारांकडून पैसे उकळले होते. तर विविध सेवा आणि वस्तूंवर त्याने सूटही मिळविली होती, अशी माहिती गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मुंधेरा याने वरुण धवनकडून ५० हजार रुपये तर शक्ती कपूर आणि त्यांची मुलगी श्रद्धा यांच्याकडून साडेसात लाख रुपये आणि टायगर श्रॉफकडून ३५ हजार रुपये घेतले होते. मुंधेरा याने नवनीत मोटर्स येथून खरेदी आणि सेवेवर दहा टक्के सूट मिळविली होती. तसेच ह्युंदाई सर्व्हिस सेंटर, मोटो गॅलेक्सी शोरुम येथूनही खरेदीवर सूट मिळविली होती. ठाण्यातीलच एका प्लायवूड स्टोअर्समधूनही त्याने अशी सूट मिळविली होती.
तोतया आयकर आयुक्त पकडला
By admin | Updated: May 31, 2016 06:34 IST