जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कृत्रिमपणे आंबे पिकवण्याच्या प्रकाराचा भंडाफोड शुक्रवारी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केला. दोन पेढ्यांवर छापा टाकून अधिकाऱ्यांनी तब्बल ८,२०० किलो आंबे जप्त करून ते नष्ट केले. अक्षय्यतृतीयेला आंब्यांना असलेली मागणी लक्षात घेऊन कॅल्शियम कार्बाइडने कच्चे आंबे पिकविण्याचा प्रकार येथे सुरू होता. त्याची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाने दोन पेढ्यांवर छापे टाकत तब्बल पाच तास कारवाई केली. त्यात तीन लाख रुपये किमतीचे ८,२०० किलो आंबे जप्त करुन शिवाजीनगरजवळील डंम्पिग ग्राउंडवर खड्डा खोदून नष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)
कृत्रिमपणे पिकवण्यात आलेले ८,२00 किलो आंबे नष्ट
By admin | Updated: May 7, 2016 01:59 IST