शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांसाठी आग्रही देशपांडे यांचीच आयोगातून बदली; दाेन आदेशांमुळे उडाली हाेती खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 06:47 IST

एस. चोकलिंगम नवे राज्य निवडणूक अधिकारी नियुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्य व पोलिस प्रशासनाने बदल्या कराव्यात, असे आदेश काढणारे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचीच आयोगाने बुधवारी बदली केली. त्यांच्या जागी एस. चोकलिंगम यांची नियुक्ती केली आहे. श्रीकांत देशपांडे हे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत आणि ते येत्या एप्रिलमध्ये निवृत्त होणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशांचा हवाला देत देशपांडे यांनी अलीकडेच दोन आदेश काढले होते. निवडणुकीच्या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या आहेत, त्याच जिल्ह्यात केल्या असतील, तर त्या रद्द कराव्यात आणि जिल्ह्याबाहेर बदल्या कराव्यात, असे आदेश देशपांडे यांनी काढले होते. पोलिस महासंचालक कार्यालयाने आयोगाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून जिल्ह्यात बदल्या केल्या, ते योग्य नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. या बदल्या कायम ठेवाव्यात, ही पोलिस महासंचालक कार्यालयाची मागणी त्यांनी फेटाळली. 

देशपांडे यांच्या दुसऱ्या आदेशाने आणखीच खळबळ माजली. महापालिका आयुुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापैकी ज्यांना तीन वर्षांचा कार्यकाळ एकाच ठिकाणी झाला असेल, त्यांचीही बदली करावी, असे आदेश देशपांडे यांनी काढले. ते मागे घ्यावेत, अशी विनंती राज्य सरकारने त्यांना केली. पण, ती त्यांनी फेटाळली. आयोगाच्या आदेशांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह काही अधिकाऱ्यांच्या बदल्या अटळ असल्याचे म्हटले जात होते. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने श्रीकांत देशपांडे यांचीच बुधवारी बदली केली.

निवडणूक आयोग व राज्य सरकार यांच्या संघर्षात देशपांडे यांची बदली झाल्याची चर्चा प्रशासनात आहे.

प्रामाणिक अधिकारीराज्याचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम हे यशदा, पुणेचे महासंचालक आहेत. प्रशासनातील अत्यंत प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग