मुंबई : २६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांशी थेट लढा देणारे मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख सदानंद दाते यांची केंद्रीय राखीव पोलीस दलात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी गृहमंत्रालयाने या आदेशाचे पत्र दाते यांना धाडले.कठोर, वक्तशीर आणि कामात अचूक अशी ओळख असलेल्या दाते यांना देशाच्या सीमेवर, निमलष्करी दलात कर्तव्य पार पाडण्याची इच्छा होती. ती त्यांनी तत्कालीन गृहमंत्र्यांना कळविली होती. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सचोटीने अभ्यास करत देशसेवा या उद्देशाने दाते आयपीएस झाले. ते १९९० बॅचचे आयपीएस आहेत. मुंबईत उपायुक्त, दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त अशी जबाबदारी त्यांनी पार पाडली. २६/११ हल्ल्यानंतर राज्य सरकारने स्थापन केलेल्या फोर्सवनचे प्रमुख म्हणून दाते यांची नियुक्ती झाली. फोर्सवनला एनएसजीच्या तुलनेत आणून ठेवण्यात दाते यांचा सिंहाचा वाटा आहे.
दाते यांची प्रतिनियुक्ती
By admin | Updated: February 11, 2015 04:35 IST