शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत निष्ठावंतांची ‘वंचित’ आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 05:33 IST

आधी विधानपरिषद सदस्यांमुळे अन् आता बाहेरच्यांमुळे अन्याय

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवबंधन बांधत शिवसेनेत दाखल झालेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि विधान परिषदेचे पहिल्यांदाच सदस्य झालेले तानाजी सावंत यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागल्याने शिवसेनेच्या विशेषत: विधानसभा सदस्यांमध्ये नाराजीची भावना दिसून आली.‘मातोश्री’च्या निकट असलेले विधान परिषद सदस्य अनिल परब, डॉ. नीलम गोºहे यांच्या पदरी निराशाच आली. काल आलेल्या क्षीरसागरांना मंत्री करताना राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर असे निष्ठावंत वंचित राहिले. सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, डॉ.दीपक सावंत अशा विधान परिषद सदस्यांना पहिल्या टप्प्यात कॅबिनेट मंत्रीपद दिल्याने शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांनी मातोश्रीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावेळी तानाजी सावंत विधान परिषदेचे सदस्य असतानाही त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. जातीपातीचा विचार शिवसेनेत होत नाही असे नेहमीच कौतुकाने म्हटले जाते. जयदत्त क्षीरसागर हे तेली समाजाचे आहेत आणि राष्ट्रवादीत येताच त्यांना शिवसेनेने कॅबिनेट मंत्री केले. क्षीरसागर यांचे तेली समाजात वजन असले तरी हा समाज मोठ्या प्रमाणात आज भाजपसोबत आहे. अशावेळी क्षीरसागर यांना संधी देताना कोणता निकष लावला असा सवाल शिवसेनेच्या एका ज्येष्ठ आमदाराने नाव न देण्याच्या अटीवर केला. क्षीरसागर आणि सावंत यांना मंत्रीपदे दिल्याने शिवसेनेच्या आघाडीवर मंत्रीपदापासून ‘वंचित’ असलेल्यांची संख्या मात्र वाढली आहे.उपमुख्यमंत्रिपद शेवटी नाहीचशिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल,अशी चर्चा होती पण तसे काहीही झाले नाही. ‘आपण शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देऊ केले होते का या प्रश्नात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की, शिवसेनेचे निर्णय हे त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेत असतात. त्यांनी मला दोघांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यास सांगितले होते. तसे मी केले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना