शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

राज्यात सिंचन प्रकल्पांसाठी तुटपुंजी तरतूद

By admin | Updated: March 18, 2016 02:12 IST

विरोधी पक्षात असताना सिंचन प्रकल्पांच्या निधीवरून तत्कालीन आघाडी सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजपातील धुरिणांनी आता त्यांचे सरकार असतानादेखील राज्यपालांच्या

- यदु जोशी,  मुंबईविरोधी पक्षात असताना सिंचन प्रकल्पांच्या निधीवरून तत्कालीन आघाडी सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजपातील धुरिणांनी आता त्यांचे सरकार असतानादेखील राज्यपालांच्या निदेशांतर्गत केवळ ५ हजार ४१० कोटी रुपयांची तुटपुंजी तरतूद केली आहे. त्यामुळे प्रकल्पांची रखडकथा कायम आहे.सिंचनासह विविध क्षेत्रांसाठी समन्यायी निधीवाटपाचे घटनादत्त अधिकार महाराष्ट्राच्या राज्यपालांना आहेत. त्यानुसार राज्यपालांनी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी जारी केलेले निदेश वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सादर केले. सिंचनाच्या विभाज्य नियतव्ययाचे वाटप राज्यपाल करीत असतात. ही रक्कम ५४१० कोटी रुपये आहे. अविभाज्य खर्चामध्ये हायड्रो प्रोजेक्ट, आंतरराज्य प्रकल्प, देखभालीवरील खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन मोडते. राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७० हजार कोटी रुपयांची गरज असताना आगामी आर्थिक वर्षासाठी केलेली तरतूद लक्षात घेतली तर प्रकल्पांची कूर्मगती कायम राहणार असल्याचे स्पष्ट होते. ‘दरवर्षी तुकडा फेकल्यासारखी तरतूद केली तर प्रकल्प २० वर्षेही पूर्ण होणार नाहीत. विकासाची कळकळ असेल तर सगळा खर्च बाजूला ठेवून सिंचनासाठी एकदम निधी देऊन टाका,’ असे आव्हान सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे विरोधी बाकांवरून आघाडी सरकारला देत असत. मात्र, सत्तेत आल्यानंतर त्यांनीही आघाडी सरकारचीच री ओढल्याचे स्पष्ट झाले. अन्य क्षेत्रातील अनुशेष दूर करण्यासाठी एकूण ४०१.९३ कोटी रुपयांचा नियतव्यय देण्यात आला आहे. त्यातील ११०.७३ कोटी (२७.५५ टक्के) विदर्भाला, २१.५३ कोटी (५.३६ टक्के) मराठवाड्याला तर २६९.६७ कोटी रुपये (६७.०९ टक्के) उर्वरित महाराष्ट्राला मिळतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंचनाकरता आगामी वर्षासाठी अविभाज्य खर्चापोटी शुक्रवारच्या अर्थसंकल्पात २ हजार ३६७ कोटी रुपयांची तरतूद असेल. विभाज्य आणि अविभाज्य मिळून एकूण तरतूद ७ हजार ७७७ कोटी रुपये राहील. आघाडी सरकारच्या काळात जवळपास एवढीच तरतूद असायची. आपण दिलेल्या निर्देशांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्तांनी दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घ्यावी, असे राज्यपालांनी म्हटले आहे.योजनेतर आणि योजनांतर्गत खर्चाची आकडेवारी दरवर्षी लवकरात लवकर प्रकाशित करावी. अर्थसंकल्पातील पारदर्शकतेची खात्री होण्यासाठी ही आकडेवारी आॅनलाइन ठेवावी, असे राज्यपालांनी म्हटले आहे.राज्यपालांचे निदेश आजच विधानसभेत सादर करण्यात आल्याने शुक्रवारच्या अर्थसंकल्पात सिंचनासाठी विभाज्य तरतूद किती असेल हे गुरुवारीच समोर आले. अप्रत्यक्षपणे का होईना, पण अर्थसंकल्प फुटला.चालू प्रकल्पांची शिल्लक किंमतप्रदेश प्रकल्पांची संख्या आवश्यक निधी(आकडे कोटी रु.मध्ये)विदर्भ १७२ २६१३८.२१ मराठवाडा ७२ १३५१३.०८उर्वरित महाराष्ट्र १५९ ३४३५६.७१एकूण ४०३ ७४००८.००