शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

६४१ उमेदवारांची अनामत जप्त

By admin | Updated: March 3, 2017 00:45 IST

महापालिका निवडणुकीत २६ लाख ३४ हजार ८०० मतदारांपैकी एकूण १४ लाख ६३ हजार ४९३ जणांनी मतदान केले.

पुणे : महापालिका निवडणुकीत २६ लाख ३४ हजार ८०० मतदारांपैकी एकूण १४ लाख ६३ हजार ४९३ जणांनी मतदान केले. प्रत्येकी चार (दोन प्रभागांमध्ये प्रत्येकी ३) याप्रमाणे एकूण ५८ लाख ४ हजार ६३५ मतदान झाले. १ हजार ९० उमेदवारांपैकी ६४१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. नोटा या पर्यायावर १ लाख ७१ हजार ५८१ मतदान झाले. एकूण मतदान ५५.५ टक्के, तर नोटाची मते ३ टक्के आहेत.महापालिका निवडणूक २०१७ ची अंतिम आकडेवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली. ४१ प्रभागांमधून नगरसेवकपदासाठी उभे राहिलेल्या १ हजार ९० उमेदवारांपैकी ६४१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. गटातील वैध मतदानाच्या तुलनेत एक अष्टमांशपेक्षा कमी मते मिळाली ( ८०० वैध मते असतील तर किमान १००पेक्षा जास्त) तर अनामत रक्कम जप्त होते. पालिकेत ९८ सदस्यांचे स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भाजपाच्या ५ उमेदवारांचीही अनामत रक्कम जप्त झाली.भाजपाला या निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे २१ लाख २८ हजार ४५२ मते मिळाली. राष्ट्रवादीला १२ लाख ७३ हजार ५२४ मते मिळाली. शिवसेनेच्या मतांची संख्या ८ लाख २३ हजार ७४४ आहे. काँग्रेसची मते ५ लाख ९८० आहेत. मनसेला ३ लाख ७३ हजार ६४५ मते मिळाली. काँग्रेसपेक्षा शिवसेनेला जास्त मते मिळाली आहेत. महापालिकेत १० वर्षे सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादीला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. >अपक्षांची एकूण संख्या ३०२ होती. त्यातील २९१ जणांना डिपॉझिट गमवावे लागले. कंसात किती जागा लढवल्या ती संख्या. मनसे (११६) ८६, शिवसेना (१४९) ६९, बहुजन समाज पार्टी (५४) ५०, काँग्रेस (८७) ४०, बहुजन मुक्ती पार्टी (१७) १७, भारिप-बहुजन महासंघ (१६) १६, राष्ट्रवादी (१२९) १६, एमआयएम (२१) १६, राष्ट्रीय समाज पक्ष (१०) ८, बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टी (८) ६, भाजपा (१५९) ५, अखिल भारतीय सम्राट सेना (५) ५, जनता दल सेक्युलर (५) ५, अखिल भारतीय सेना (२) २, राष्ट्रीय मराठा पार्टी (३) २, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (१) १, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (२) २, संभाजी ब्रिगेड (१) १, भारतीय शेतकरी कामगार पक्ष (१) १, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया अ (२) १>प्रमुख राजकीय पक्षांना पडलेली मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : भारतीय जनता पार्टी- ३६. ६, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- २१.९४, शिवसेना- १४. १९, काँग्रेस-८. ६३, मनसे-६.४४,