शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

विदर्भ राज्यविरोधी पक्षांना हद्दपार करा

By admin | Updated: January 19, 2017 00:18 IST

स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीला विरोध करणाऱ्या शिवसेना, मनसे आणि काँग्रेस पक्षालाही विदर्भातून हद्दपार करा

अमरावती : स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीला विरोध करणाऱ्या शिवसेना, मनसे आणि काँग्रेस पक्षालाही विदर्भातून हद्दपार करा, असे भावनिक आवाहन विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत केले.आॅल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकच्या वतीने स्वतंत्र विदर्भ व शेतकरीहिताच्या मागण्यांकरिता २३ जानेवारीपासून आयोजित बेमुदत उपोषणाबाबत धोटे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीचा लढा हा फार जुना आहे. शेतकरी, बेरोजगार, कामगार, शोषित, भ्रष्टाचार व व्यसनमुक्त विदर्भ राज्य निर्माण करण्यात यावे, या मागणीसाठी आॅल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे खंदे कार्यकर्ते आता मैदानात उतरले आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीची मागणी ही राजकीय नाही. मात्र, काही राजकीय पक्ष स्वतंत्र विदर्भ राज्य होऊ नये, यासाठी पराकोटीचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीला विरोध करणारे प्रमुख पक्ष जसे शिवसेना, मनसे व त्यापाठोपाठ काँग्रेस पक्षालाही विदर्भातून हद्दपार करावे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. हिंदी भाषकांची अनेक राज्ये निर्माण झाली आहेत, मग मराठी भाषकांची दोन राज्ये का होऊ शकत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीची जबाबदारी केंद्र शासनावर आहे. देशात आणि राज्यात भाजपाचे शासन असल्याने आता स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आवाज बुलंद करण्याची वेळ आल्याचेही ते म्हणाले. स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीची मागणी शासनापर्यंत पोहोचावी, यासाठी २३ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले जाणार आहे. (प्रतिनिधी)