भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वर प्रासादिक दिंडीचे संत सोपानकाका पालखी सोहळ्यासाठी आज माळशिरसहून सासवडकडे प्रस्थान झाले. सकाळी माळशिरसमध्ये लक्ष्मणमहाराज यादव, भरतमहाराज यादव, पोपटअण्णा वाघले यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडीचे वीणापूजन करण्यात आले. सकाळी माळशिरस येथे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात हरिपाठ वाचन व आरती करण्यात आली. त्यानंतर दिंडीचा शुभारंभ भुलेश्वरमहाराज की जयच्या जयघोषाने करण्यात आला. टाळ मृदंगाच्या तालावर अभंगांच्या मंजुळ स्वरात दिंडीची गावात नगरप्रदक्षिणा झाली. गावाच्या मुख्य चौकात भुलेश्वराची महाआरती करण्यात आली. त्यानंतर दिंडीचे सासवडकडे प्रस्थान झाले. या वेळी भुलेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अरुण यादव, पुरंदर तालुका गुरव समाजाचे अध्यक्ष विनय गुरव, भुलेश्वर साखर कारखान्याचे संचालक गणेश ढोले, शांताराम यादव, माऊली यादव उपस्थित होते.
श्री भुलेश्वर प्रासादिक दिंडीचे प्रस्थान
By admin | Updated: July 4, 2016 01:53 IST