शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

देवरूखचा सागर राष्ट्रीय इनडोअर हॉकी संघात

By admin | Updated: November 25, 2014 00:31 IST

नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत सागर पवार याने राज्याच्या संघातून चमकदार कामगिरी करीत बलाढ्य पंजाब संघावर मात केली.

देवरुख : इयत्ता अकरावीमध्ये हॉकीची स्टीक हाती घेतलेल्या आणि ग्रामीण भागातून अतिशय खडतरपणे कठोर परिश्रम घेत संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावच्या सागर शांताराम पवार या खेळाडूने राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून केलेल्या चमकदार प्रदर्शनाच्या जोरावर त्याची राष्ट्रीय इनडोअर हॉकी संघात निवड करण्यात आली आहे. नुकत्याच नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत सागर पवार याने राज्याच्या संघातून चमकदार कामगिरी करीत बलाढ्य पंजाब संघावर मात केली. या अटीतटीच्या लढ्यात महाराष्ट्राचा गोलकिपर म्हणून उत्कृष्ट बचाव केला होता. याच जोरावर राष्ट्रीय निवड समितीने त्याची राष्ट्रीय संघात निवड केली. सागर हा महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारा संगमेश्वर तालुक्यातील मारळ या ग्रामीण भागातील खेळाडू आहे. आता तो ‘मलेशिया- पेनांग’ येथे भारतीय संघातून गोलकिपर म्हणून खेळणार आहे. सागर पवार हा सध्या अमरावती येथील राष्ट्रीय निवड चाचणीमध्ये सहभागी आहे. त्याची निवड झाल्याचे पत्र २२ नोव्हेंबर रोजी राज्य हॉकी असोसिएशनला इनडोअर हॉकी असोसिएशन इंडियाने केले होते. त्यामध्ये निवड झाल्याचे सांगून पासपोर्ट व्हीसा काढण्याबाबतचे निर्देश देण्यात आले होते. सागर पवारचे शालेय शिक्षण मारळ व आंगवली हायस्कूल येथे, बारावीपर्यंतचे शिक्षण आठल्ये - सपे्र - पित्रे महाविद्यालय, देवरुखमध्ये, तर नंतर डी. एड. पुणे येथे झाले आहे. सागरची हॉकीसाठीची सुरुवात १९ वर्षांखालील वयोगटातून झाली. जिल्हा विभागातून राज्य पातळीवर निवड झाली होती. यावेळी सातारा येथील राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर खुल्या गटातून परभणी येथे राज्य अजिंक्यपदासाठी निवड, याबरोबरच अमरावती येथे राष्ट्रीय निवड चाचणीसाठी तो सहभागी झाला होता. त्याचे प्रशिक्षक निखील सुनील कोळवणकर हे बोलताना म्हणाले की, सागरची कारकिर्द आऊटडोअरकडून इनडोअर अशी झाली आहे. सागर हा हॉकी खेळाच्या सरावासाठी मारळहून देवरुखमध्ये सकाळी ६ वाजता येत असे, त्याच्यातील गुणवत्ता ओळखून त्याला योग्य दिशा दिली, असे ते म्हणाले.सागर हा महाराष्ट्राचा हॉकी संघाचा गोलकिपर आहे. त्याची आष्टा येथील डांगे पब्लिक स्कूलमध्ये हॉकी कोच म्हणून नियुक्ती झाली होती, तर आता त्याची पेनांग मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. सागरला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी सांगलीचे पांगम, खातीक, देवरुखमधील त्याचे प्रशिक्षक व महाराष्ट्र इनडोअर हॉकी असोसिएशनचे सदस्य निखिल कोळवणकर, डॉ. राजकुमार इंगळे, विनोद पोळ यांचे मार्गदर्शन लाभले. सुनील लिंगायत, मारळचे सरपंच विनायक सावंत, प्रसाद सावंत, नंदकुमार सावंत, समीर आंबेकर यांनी त्याचे अभिनंदन केले. (वार्ताहर)जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमच्या जोरावर सागर याने राष्ट्रीयस्तरापर्यंत धडक मारली आहे. त्याला लहानपणापासूनच हॉकीची आवड होती. त्यामुळे त्याने या खेळाची कास धरली आणि शेवटपर्यंत तो अपयशाचे खचून गेला नाही तर नव्याने उभा राहिला. त्यामुळेच त्याने एवढ्या पातळीपर्यंत मजल मारली आहे. त्याने या राष्ट्रीयस्तरावरही चांगली कामगिरी करावी आणि कुटुंबाचे, तालुक्याचे आणि जिल्ह्याचेही नाव उज्ज्वल करावे.- शांताराम तुकाराम पवार,(सागरचे वडील)