शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पहाटे दाट धुके, दुपारी कडक ऊन!

By admin | Updated: April 12, 2017 21:08 IST

गेल्या काही दिवसांपासून ४० अंशापेक्षा जादा तापमानाचा सामना करणाऱ्या सांगलीकरांना बुधवारी पहाटेच्या सुमारास धुक्याच्या दाट दुलईचा आल्हाददायक आनंद मिळाला.

ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 12 : गेल्या काही दिवसांपासून ४० अंशापेक्षा जादा तापमानाचा सामना करणाऱ्या सांगलीकरांना बुधवारी पहाटेच्या सुमारास धुक्याच्या दाट दुलईचा आल्हाददायक आनंद मिळाला. पहाटे पाचपासून सकाळी सातपर्यंत शहर अक्षरश: धुक्यात गायब झाले होते. पहाटे जॉगिंग, वॉकिंगला बाहेर पडणाऱ्यांनी धुक्याचा हा सुखद धक्का अनुभवला. दुपारनंतर मात्र पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवला. दुपारी सांगलीचा पारा ४२ अंशापर्यंत गेला होता.गेल्या आठवड्याभरापासून सांगलीकर उन्हाच्या तडाख्याने होरपळून निघत आहेत. उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाहीलाही होत असताना बुधवारी पहाटेच्या सुमारास नागरिकांना गारव्याचा अनुभव आला. पहाटेच्या सुमारास शहरावर धुक्याची चादर पसरली होती. सकाळी आठपर्यंत हे धुके शहरावर कायम होते. या धुक्याच्या गारव्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना हिवाळ्यातील वातावरण अनुभवण्यास मिळाले. तसेच निसर्गाचा हा चमत्कारही अनुभवता आला. पसरलेले धुके आणि थंडीमुळे शहरवासीयांना उकड्यातून काहीसा थंडावा मिळाला. पण वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे आरोग्यामध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे.पहाटे लवकर सुरू होणाऱ्या चहा-नाष्ट्याच्या गाड्यांवर कामावर जाणाऱ्यांची, तसेच फिरायला जाणाऱ्यांची गर्दी झाली. हिमवर्षाव झाल्यानंतर किंवा तीव्र थंडीची लाट आल्यानंतर जशा तोंडातून गरम वाफा बाहेर पडतात, तसाच अनुभव बुधवारी सकाळी नागरिकांना आला. गावभाग, कृष्णा नदीकाठ परिसर, आमराई, वखारभाग, खणभाग, विश्रामबाग, कोल्हापूर रस्ता आदी भागातून आठ-साडेआठनंतरच नागरिकांची नित्यकामाची लगबग जाणवू लागली. धुक्याचे हे वातावरण टिपण्यासाठी अनेकांनी सेल्फी काढून घेतली. अनेकांनी सोशल मीडियावरून मित्रमंडळी, नातेवाईकांशी, हा धुक्याचा आनंद लुटण्यासाठी संपर्क साधला होता. सकाळच्या हुडहुडी भरविणाऱ्या या गारव्याचा आनंद काही तासच टिकला. दुपारनंतर पुन्हा उन्हाचा तडाखा वाढला. दुपारच्या सुमारास तब्बल ४२ अंशावर पारा गेला होता.शिराळा पश्चिम भाग गारठलाशिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात पहाटेपासून सकाळी नऊपर्यंत दाट धुके पसरले होते. वाहनधारकांना वाहनांचे दिवे लावूनच वाहन चालवावे लागत होते. शिराळा तालुक्याचे पश्चिम भागातील कोककणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या पावलेवाडी खिंडीपासून चांदोलीपर्यंत मंगळवारी मध्यरात्रीपासून सकाळी नऊपर्यंत दाट धुके होते. हवेत थंडी होती, गारठा जाणवत होता. त्यामुळे शेतीची कामे करण्यात अडथळे निर्माण झाले होते. शाळकरी मुलांना परीक्षेसाठी धुक्यातून वाट काढतच जावे लागले.