शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

उपाध्यायच्या बंदोबस्तास नकार

By admin | Updated: February 8, 2017 05:05 IST

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी निवृत्त मेजर रमेश उपाध्याय हा उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या सभागृहात प्रवेशासाठी इच्छुक आहे.

जमीर काझी, मुंबईमालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी निवृत्त मेजर रमेश उपाध्याय हा उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या सभागृहात प्रवेशासाठी इच्छुक आहे. मात्र त्याच्या निवडणूक प्रचारावेळी पोलीस संरक्षण पुरविण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दल तयार नाही. त्याला बंदोबस्तात उत्तर प्रदेशात सोडू, त्यानंतर त्यानी स्थानिक पोलिसांकडून बंदोबस्त घ्यावा, असा निर्र्णय पोलिसांनी घेतला आहे. त्याबाबत लवकरच राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयात प्रस्ताव दिला जाणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.रमेश उपाध्याय हा सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात आहे. निवडणुकीसाठी त्याला न्यायालयाने तीन आठवड्याचा तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. मात्र या कालावधीत सशुल्क सशस्त्र बंदोबस्त (एस्कॉर्ट) पुरविण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. मात्र तेथील भौगोलिक परिस्थिती आणि कायदा, सुव्यवस्थेबाबत अनभिज्ञ असल्याने महाराष्ट्राचे पोलीस पाठविणे योग्य नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे त्याबाबतचा अहवाल लवकरच न्यायालयात सादर केला जाणार आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी हिंदू महासभेने रमेश उपाध्यायला बैरिया या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचे हे मूळ गाव असून निवडणुकीत सहभागी होण्यासाठी विशेष न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी त्याला तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. सात एप्रिल ते सात मे या कालावधीतील ३ आठवडे निश्चित करुन त्याला प्रचारसभेत सहभागी होता येणार आहे. मात्र त्याला या पूर्ण कालावधीत सशस्त्र पोलीस बंदोबस्त पुरवून त्याच्या प्रत्येक हालचाली, भेटणाऱ्या व्यक्ती, येणारे फोन यांचा सविस्तर रेकॉर्ड ठेवण्याची सूचना न्यायालयाने पोलिसांना केली आहे. त्यानुसार सध्या तो तळोजा कारागृहात असल्याने त्याची जबाबदारी नवी मुंबई पोलिसांवर आली आहे. त्यामुळे या कार्यक्षेत्रातून त्याला जामीनाच्या काळात सशस्त्र बंदोबस्त पुरवावा लागणार आहे. मात्र उत्तरप्रदेशातील स्थानिक परिस्थिती, भौगोलिक माहिती, उपाध्यायबाबत स्थानिकांमध्ये असलेली भावना याबाबत नवी मुंबई पोलिसांना काहीही माहिती नाही. त्याचप्रमाणे तेथील कायदा व सुव्यवस्थेबाबत अनभिज्ञ असल्याने नवी मुुंबई पोलिसांना तेथे बंदोबस्तासाठी पाठविणे योग्य होणार नाही. त्याऐवजी त्याला उत्तर प्रदेशाच्या सीमेपर्यंत पुरेशा बंदोबस्तात पाठवू, त्यानंतर स्थानिक पोलिसांनी बंदोबस्त पुरवावा, असा निर्णय नवी मुंबई पोलिसांनी घेतला आहे. परतताना त्याला पुन्हा ताब्यात घेतले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव बनविण्यात आला असून कोर्टात सादर केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. २००८ मध्ये मालेगाव येथे झाालेल्या भीषण बॉम्बस्फोटाच्या कटात साध्वी प्रज्ञासिंग, श्रीकांत पुरोहित यांच्यासह उपाध्यायचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तत्कालिन एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी त्याला अटक केली होती. राज्यात व केंद्रात सत्ता बदल झाल्यानंतर मात्र ‘एनआयए’ने या खटल्याबाबत सौम्य भूमिका घेतल्याची चर्चा विरोधकांकडून होत असते. याबाबत आपल्याला खटल्यातून बाजूला होण्याची सूचना तत्कालिन अधिकारी सुहास वारके यांनी केली होती, असा आक्षेप घेत ज्येष्ठ सरकारी वकील रोहिनी सॅलियन यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. याप्रकरणाचा तपास सुरु आहे.