शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विलिनीकरणानंतरही देना-विजया बँकेचे एटीएम धनादेश वटणार , ग्राहकांना दिलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 19:21 IST

बँक ऑफ बडोदामध्ये विजया व देना बँकेचे विलिनीकरण सोमवारपासून (दि. १) लागू झाले.

ठळक मुद्देमाहिती तंत्रज्ञानाच्या एकात्मिकरणास लागेल दोन वर्षांचा कालावधीतिन्ही बँकांचे विलिनीकरण झाल्यानंतर बँक ऑफ बडोदा देशातील दुसऱ्या क्रमांकाची सार्वजनिक बँक एप्रिल अखेरीस बँकेच्या सर्व शाखांमध्ये बँकींग सुविधा सुरु

पुणे : बँक ऑफ बडोदामध्ये विजया व देना बँकेचे विलिनीकरण सोमवारपासून (दि. १) लागू झाले. बँकांची विलिनीकरणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी बँक व्यवस्थापनाची घडी बसेपर्यंत देना व विजया बँकेचे एटीएम, धनादेश, खातेक्रमांक पूर्वी प्रमाणेच सुरु राहील. या बँकांना बडोदा बँकेची सुविधाही वापरता येईल, अशी माहिती बँक ऑफ बडोदाच्या पुणे विभागीय कार्यालयाचे महाव्यवस्थापक राजेश कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. तिन्ही बँकांचे विलिनीकरण झाल्यानंतर बँक ऑफ बडोदा देशातील दुसऱ्या क्रमांकाची सार्वजनिक बँक झाली आहे. विलिनीकरणानंतर बँकेच्या देशभरातील शाखांची संख्या साडेनऊ हजारांहून अधिक होणार असून, वार्षिक उलाढाल १५ लाख कोटींच्या वर जाईल. पुणे विभागीय कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक (पूवीर्ची विजया बँक) जे. राम गोपाल आणि उप महाव्यवस्थापक (देना) महेंद्रसिंग रोहेरिया या वेळी उपस्थित होते.   बँकेच्या विलिनीकरणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील टप्प्यात देना व विजया बँकेतील माहिती तंत्रज्ञान विभागाचे एकात्मिकीकरण होईल. त्यासाठी तिन्ही बँकांच्या खातेदारांची माहिती एका कोअर बँकींग सिस्टीमवर समाविष्ट केली जाणार आहे. त्यासाठी १८ ते २४ महिन्यांचा कालावधी लागेल. एप्रिल अखेरीस बँकेच्या सर्व शाखांमध्ये बँकींग सुविधा सुरु करण्यात येईल. या व्यवस्था बदलाच्या कालावधीत ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांचे एटीएम कार्ड, धनादेश अशा सर्व सुविधा जुन्या बँकेच्या चालू राहतील. आता या पुढे सर्व ग्राहकांना बँक ऑफ बडोदाची कर्ज आणि इतर सेवा लागू होतील. तसेच, व्याज दर देखील बडोदा बँकेचेच राहतील.   --विलिनीकरणानंतर बँक ऑफ बडोदाचे बळ होणार तिप्पट-बँकेच्या शाखांची संख्या ९५०० आणि एटीएमची संख्या होणार १३,४०० हून अधिक- कर्मचाऱ्यांची संख्या ८५ हजार आणि ठेवीदार-खातेदार १२ कोटींहून अधिक- वार्षिक उलाढाल जाणार १५ लाख कोटी रुपयांवर, ठेवी ८.७५ लाख कोटींवर - महाराष्ट्रात बँक व्यवसायातील ८ ते १० टक्के वाटा येणार बडोदा बँकेकडे- पीपल कॅपिटल इंडेक्समध्ये (पीसीआय) आघाडीच्या ५० कंपन्यांमध्ये स्थान

अनुत्पादक खातीही बडोदा बँकेचीबँक ऑफ बडोदामध्ये नक्त (नेट) अनुत्पादक खात्यांचे (एनपीए) प्रमाण ५ टक्क्यांच्या आत असून, विजयाचा बँकेचे ४ आणि देना बँकेचा नेट एनपीए  १० टक्के इतका आहे. बँकेच्या मालमत्तेबरोबरच देणी देखील बँक ऑफ बडोदाकडे येईल. 

टॅग्स :Puneपुणेbankबँक