पुणो : डेक्कन जिमखाना येथील गुडलक चौकामध्ये मराठी साम्राज्य सेनेतर्फे हेल्मेट सक्तीविरोधात निदर्शने करून आंदोलन केले. पोलीस प्रशासनाने सामान्य नागरिकांना वेठीस धरून कारवाई करू नये. शहरात हेल्मेटचा तुटवडा असल्यामुळे, हेल्मेटची काळ्या बाजाराने विक्री होत आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक नुकसान होत आहे. प्रथम प्रशासनाच्या वतीने जनजागृती करून सर्वसामान्य नागरिकांना हेल्मेटसक्तीचा त्रस होणार नाही, अशी उपाययोजना करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जया शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष अविनाश सकुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा अॅड. सई जाधव, स्वप्निल तळेकर, नवनाथ खिलारे, मयूर घारे, परेश शिर्सगे, विनोद वैरागर, संकेत वरखडे, अविनाश खेडकर नागरिक सहभागी झाले होते. (वार्ताहर)