शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
3
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
4
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
5
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
6
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
7
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
8
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
9
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
10
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
11
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
12
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
13
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
14
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
15
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
16
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
17
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
18
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
19
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
20
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?

वेगळ्या विदर्भासाठी गडकरींच्या वाड्यापुढे निदर्शने

By admin | Updated: August 3, 2014 00:59 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा करावी. तसेच महाराष्ट्रासोबतच विदर्भ राज्याच्याही निवडणुका घ्याव्या, अशी मागणी क रीत विदर्भ राज्य आंदोलन

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आंदोलन : आता आश्वासनाची पूर्तता करानागपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा करावी. तसेच महाराष्ट्रासोबतच विदर्भ राज्याच्याही निवडणुका घ्याव्या, अशी मागणी क रीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यानी शनिवारी मोर्चा काढून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील वाड्यापुढे निदर्शने केली.विदर्भाची मागणी जुनी आहे. यासाठी आजवर अनेक आंदोलने झाली. विदर्भ हे आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकते, अशी शिफारस वेगवेगळ्या आयोगांनी केंद्र शासनाकडे केली आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना तीन नवीन राज्यांची निर्मिती करण्यात आली. भाजपच्या जाहीरनाम्यातसुद्धा लहान राज्यांना पाठिंबा दर्शविला आहे. एवढेच नव्हेतर भुवनेश्वर येथील भाजप कार्यकारिणीच्या बैठकीतही विदर्भासंदर्भात सकारात्मक भूमिका होती. केंद्रात सत्ता आली तर विदर्भ राज्य देण्याचे अभिवचन भाजप नेत्यांनी दिले होते. आता त्यांनी आश्वासन पूर्ण करावे . यासाठी समितीचे राम नेवले, अरुण केदार, डॉ. सुनील बजाज, अ‍ॅड. नंदा पराते, वसंतराव कांबळे, अरुण वनकर, प्रवीण महाजन, मुरलीधर ठाकरे, राम आकरे, दिलीप नरवडिया, जनमंचचे चंद्रकांत वानखेडे, अ‍ॅड. अनिल किलोर, शरद पाटील आदींच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. वैदर्भीय खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विदर्भाच्या मागणीसाठी दबाव आणावा, यासाठी नागपूरसह विदर्भातील ठिकठिकाणी खासदारांच्या निवासापुढे शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आल्याची माहिती नेवले यांनी दिली. विधानसभा निवडणुकीपूर्वी वेगळ्या विदर्भाची निर्मिती झाली नाही तर यासाठी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.आंदोलनात अण्णाजी पांडुरंग सावराजेधर, इंजिनिअर धर्मराज रेवतकर, श्याम वाघ, राजेंद्र तिजारे, अशोक सरस्वती याच्यासह विदर्भ राज्य जनआंदोलन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी) पोलिसांसोबत धक्काबुक्कीपोलिसांनी आंदोलकांना महाल चौकात अडविण्याचा प्रयत्न केला. मार्गात कठडे लावले होते. परंतु आंदोलकांनी न जुमानता गडकरी यांच्या वाड्याकडे धाव घेतली. यावेळी पोलीस व आंदोलकात धक्काबुक्की झाली. परंतु हा वाद लगेच शमला. आंदोलन शांततेत पार पडले.