शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारमुळे लोकशाही धोक्यात!

By admin | Updated: April 25, 2016 00:41 IST

केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करून उत्तराखंडसारख्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांमुळे लोकशाही धोक्यात येत असून

गणेश धुरी,  नाशिककेंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करून उत्तराखंडसारख्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांमुळे लोकशाही धोक्यात येत असून, केंद्राचा हा प्रयत्न म्हणजे राज्ये बळकावण्याचाच प्रकार आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्यक्ष नामोल्लेख न करता त्यांच्या अनेक भूमिकांवर घणाघाती टीका केली. रविवारी नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. युती आहे काय, नाही काय काही फरक पडत नाही. भाजपसोबत आमची युती सत्तेसाठी नव्हे, तर केवळ हिंदुत्वाच्या मुद्यावर होती; परंतु तोही मुद्दा मागे पडला तर भाजपसोबत युती करणार नाही, असे उद्धव यांनी भाजपला ठणकावले. लहान राज्यांचा आग्रह धरणाऱ्या भाजप आणि पंतप्रधान मोदींना त्यांनी सवाल केला. ते म्हणाले, लहान राज्य कशासाठी? राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी? तुमच्या अशा धोरणामुळे लोकशाही धोक्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले, प्रत्येक प्रश्नावर राजकारण करण्याची आवश्यकता नाही. दुष्काळाच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये. महाराष्ट्रावर कोसळलेले हे भयंकर संकट आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पक्षभेद आणि मतभेद विसरून सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. तहानलेल्या लोकांना जर पाणी दिले नाही तर सत्ता काय कामाची? मित्राला सावध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.आमचे हिंदुत्व बेगडी हिंदुत्व नाही. देशाच्या सुरक्षेच्या आड येणाऱ्या पाकिस्तानशी दोन हात करायचे, पठाणकोट हल्ल्याचा बदला घ्यायचा, हे आमचे हिंदुत्व आहे, असे सांगत आम्ही मराठी आणि अमराठी असा वाद उकरत नाही, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला. > कन्हैयाचा जन्म का झाला?आजच्या युवा पिढीला कोणी मार्गदर्शन करण्यास तयार नाही. रोहित वेमुला गेला. हार्दिकला देशद्रोही ठरविले. आता कन्हैया कुमारला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मुळातच कन्हैया जन्माला का आला? त्याला जन्माला कोणी घातले, याचा विचार ज्याने त्याने करावा, असा अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरे यांनी मोदींना लगावला.एक हाती सत्ता हेच उद्दिष्टकेवळ नाशिक महापालिकेवरच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रातील सर्व महापालिका व जिल्हा परिषदांवर एक हाती सत्ता मिळविण्याचे शिवसेनेचे उद्दिष्ट आहे. शिवसैनिकांनीही त्यासाठी झटले पाहिजे. आज राज्य दुष्काळात होरपळत असताना माझ्या शिवसैनिकांनी कर्जबाजारी शेतकऱ्यांना आधार द्यावा, असे आवाहनही उद्धव यांनी केले.> ...तरच युती होईलआगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. भाजपला युती व्हावी, असे वाटत असेल तर त्यासाठी ज्या हिंदुत्वाच्या मुद्यावर वर्षानुवर्षे युती झाली तो मुद्दा हवा.दोन्ही बाजूची गरज असेल तरच युती होईल, असे उद्धव यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले.