शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेपुढे सेनेला जनतेचा विसर!

By admin | Updated: December 6, 2014 03:49 IST

सत्तेत सहभागी होताना शिवसेनेने जनभावनेचा आदर राखत एकत्र आल्याचा दावा केला

अतुल कुलकर्णी, मुंबई सत्तेत सहभागी होताना शिवसेनेने जनभावनेचा आदर राखत एकत्र आल्याचा दावा केला. मात्र आठच दिवसांपूर्वी राज्यपालांना भेटून दुष्काळी शेतकऱ्यांसाठी आपण काही मागण्या केल्या होत्या; त्याविषयी आपली भूमिका नेमकी काय असेल, हे सांगण्याचे सौजन्य मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेताना दाखवले नाही. शेतकऱ्यांना एकरी किमान दहा हजार रुपये मदत मिळेल का? दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे पीक कर्जमाफ होईल का? उजनीचे २१ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळेल का? जायकवाडी धरणात १८ टीएमसी पाणी सोडले जाईल का? या एकाही प्रश्नाचे उत्तर न देताच शिवसेना सत्तेत सहभागी झाली आहे. शपथ घेताना सगळ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण केले, उद्धव ठाकरेंना वंदन केले. नंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना मात्र एकाही मंत्र्याने राज्यपालांना दिलेल्या निवेदनातील एकाही मागणीचा साधा उल्लेखही केला नाही.तत्कालीन विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे यांना घेऊन उद्धव ठाकरे मराठवाडा, विदर्भाच्या दौऱ्यावर गेले होते. शिवसेना तुमच्या सोबत आहे हा विश्वास देण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे भावनिक आश्वासनही त्यांनी त्यावेळी दिले होते. दुष्काळी दौऱ्यात महसूलमंत्री एकनाथ खडसेंवर आरोप करणारी शिवसेना शुक्रवारी मात्र सत्तेसाठी त्याच खडसेंच्या मांडीला मांडी लावून बसल्याचे पहावयास मिळाले.राज्यपालांना दिलेल्या निवेदनात, १८३ अपूर्ण प्रकल्पांसाठी १३,५८२ कोटी रुपये लागणार आहेत, हा निधी विशेष बाब म्हणून द्यावा, शिवाय २२०० कोटीचे ७६ प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी पडून आहेत ते तातडीने मान्य करावेत, अशा धाडसी मागण्यांचाही समावेश होता. मात्र सत्तेत जातानाही आम्ही त्या मागण्या विसरलेलो नाहीत, हे शिवसेनेने सांगितले असते तर दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. राज्यपालांनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करावा, अशी मागणी शिवसेनेने केली होती. आता सेना सत्तेत सहभागी आहे तेव्हा त्यांनी राज्यपालांना दुष्काळी भागाचा दौरा काढण्यासाठी राजी केले पाहिजे, शिवाय त्यांनी निवेदनात केलेल्या मागण्या पूर्ण करून दाखविण्याची आयती संधी चालून आली आहे. त्यामुळे हे सगळे सेनेने साध्य केले तरच सेनेच्या उक्ती आणि कृतीत अंतर नाही, असे म्हणता येईल.