शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
2
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
3
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
4
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
5
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
6
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
7
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
8
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
9
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
10
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
11
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
12
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
13
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
14
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
15
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
16
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
17
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
18
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
19
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
20
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...

दानवे भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष

By admin | Updated: January 3, 2015 02:49 IST

केंद्र सरकारमधील अन्न व सार्वजनिक वितरण व्यवस्था खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्याचा निर्णय पक्का झाला

निर्णय पक्का : भाजपाध्यक्ष अमित शहा यांची दानवेंना पसंतीमुंबई : केंद्र सरकारमधील अन्न व सार्वजनिक वितरण व्यवस्था खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्याचा निर्णय पक्का झाला असून तसे संकेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी बैठकीत दिले. प्रदेशाध्यक्षपद दानवे यांच्याऐवजी सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर या तरुणाकडे जावे, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह होता. मात्र दानवे यांच्या नावाला शहा यांनी पसंती दिल्याचे समजते.मराठवाड्यातील जालना लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा विजयी झालेले दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर होऊन विद्यमान प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. ‘एक व्यक्ति एक पद’ या सुत्रानुसार प्रदेशाध्यक्ष पदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू होता.प्रारंभी चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा होती. पण पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे दानवे यांच्याकडे ही जबाबदारी सुपूर्द करण्याचा निर्णय झाला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. विदर्भाकडे मुख्यमंत्री पद तर मराठवाड्याकडे प्रदेशाध्यक्ष पद देऊन भाजपाने प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर मराठवाड्याकडे दुसऱ्यांदा हे पद आले आहे. (विशेष प्रतिनिधी)प्रदेशाध्यक्षपदासाठी मोदी सरकारमधील राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव निश्चित झाल्याचे वृत्त लोकमतने २ जानेवारीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. हे वृत्त शुक्रवारी तंतोतंत खरे ठरले.