शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील टँकरच्या मागणीत दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 00:39 IST

शहरामध्ये सोसायट्या, वस्त्या यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत दुपटीने वाढ नोंदविण्यात आली

पुणे : शहरामध्ये सोसायट्या, वस्त्या यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत दुपटीने वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराला दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची केलेली घोषणा प्रत्यक्षात न उतरता कागदावरच राहिली असल्याचे स्पष्ट होत आहे. महापालिकेकडून केला जाणारा पाणीपुरवठा मोठ्या सोसायट्या तसेच वस्ती भागाला अपुरा पडू लागला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमानामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी शहरातील पाण्याची मागणीही वाढू लागली आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुंबईमध्ये कालवा समितीची बैठक झाली होती. या बैठकीत शहराला दररोज १३५० एमएलडी पाणी देऊन दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र १३५० एमएलडीइतक्या पाण्यामध्ये संपूर्ण शहराला दोन वेळा पाणी देणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून त्याच वेळी स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे या घोषणेची अंमलबजावणी कागदावरच राहिली आहे. केवळ पेठांचा काही भाग वगळता इतरत्र एक वेळच पाणी दिले जात आहे. उन्हाळ्यामध्ये दरवर्षी पाण्याच्या मागणीत वाढ होते, त्यामुळे टँकरच्या फेऱ्या वाढतात. मात्र धरणसाठ्यात पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागतो आहे. जानेवारी महिन्यापर्यंत शहरातून प्रतिदिवस सरासरी १६० टँकर घेण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात ही संख्या २१० वर पोहोचली, तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात सरासरी ३३५ टँकर दररोज लागतात. सोसायट्यांबरोबरच मोठे हॉटेल, आयटी कंपन्या, मॉल, हॉस्टेल यांच्याकडून टँकरची मागणी वाढली आहे. महापालिकेच्या जलकेंद्रातून पाणी उचलणाऱ्या टँकरचालकांनी सोसायट्या व वस्ती भागाला प्राधान्याने पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात या व्यावसायिक कारणासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. वडगावशेरी, चंदननगर, खराडी, टिंगरेनगर, धानोरी, बावधन, बाणेर, पाषाण आदी भागांमधील सोसायट्या व वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नगर रस्ता, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी आदी भागाला भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन टाकण्यात येत आहे. मार्च २०१७ अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र शेतकऱ्यांचे पुनर्वसन या प्रश्नावरून भामा आसखेड पाइपलाइनचे काम रखडले आहे. त्यामुळे पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी या भागातील नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.चार जलकेंद्रांवर टँकर भरणामहापालिकेच्या पर्वती, चतु:शृंगी, वडगावशेरी, रामटेकडी, पद्मावती आदी भागाला ४ जलकेंद्रांवरून टँकरचालकांना पाणी उपलबध करून दिले. महापालिकेकडून एका टँकरच्या पाण्यासाठी ४५० रुपये शुल्क आकारले जाते. टँकरचालकांकडून १२०० ते १४०० रुपयांमध्ये नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. महापालिकेव्यतिरिक्त २०० खासगी बोअर, विहीरमालकांकडून टँकरसाठी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. त्यांच्याकडून १२५ ते १५० रुपये एका टँकरमागे घेतले जातात.उन्हाळ्यामध्ये दरवर्षी पाण्याच्या मागणीत वाढ होते, त्यामुळे टँकरच्या फेऱ्या वाढतात. मात्र धरणसाठ्यात पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागतो आहे. जानेवारी महिन्यापर्यंत शहरातून प्रतिदिवस सरासरी १६० टँकर घेण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात ही संख्या २१० वर पोहोचली, तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात सरासरी ३३५ टँकर दररोज लागतात. टॅँकर चालकांनी मनमानी पद्धतीने पाण्याची विक्री सुरू केली असल्याच्या तक्रारी आहेत.>मोठ्या हॉटेलकडून सर्वाधिक मागणीशहरातील फाइव्ह स्टार, थ्री स्टार हॉटेलना नेहमी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. उन्हाळा सुरू होताच त्यांच्याकडून पाण्याच्या टँकरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर मॉल्स, हॉस्टेल, आयटी कंपन्या यांनाही टँक रची आवश्यकता भासत आहे.