शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
4
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
5
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
6
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
7
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
8
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
9
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
10
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
11
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
12
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
13
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
14
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
15
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
16
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
17
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
18
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
19
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी 'त्या' मुलीची मागणी

By admin | Updated: May 26, 2016 20:45 IST

बारामती तालुक्यातील तरडोलीनजीक घायगुडेवस्तीतील त्या अल्पवयीन मुलीची मागणी याच कारणासाठी होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला

ऑनलाइन लोकमत

मोरगाव/वडगाव निंबाळकर, दि. 26-  दौंड तालुक्यात काही दिवसांपूर्वी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी घडलेल्या पूजेच्या अघोरी प्रकारानंतर आता बारामती तालुक्यातील तरडोलीनजीक घायगुडेवस्तीतील त्या अल्पवयीन मुलीची मागणी याच कारणासाठी होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी अखेर तीन दिवसांनी जादूटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गत सहा जणांवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अजूनही इतरांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र, अद्याप मुख्य सूत्रधारापर्यंत पोलीस पोहोचू शकलेले नाहीत. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नाना मारुती कोळेकर (रा. मासाळवाडी, ता. बारामती), दिगंबर बापूराव भापकर, महदेव बाजीराव भापकर, भाऊसाहेब गेणबा सोनवलकर (तिघेही रा. लोणी भापकर, ता. बारामती), पोपट शिवराम नाळे (रा. दुधेबावी, ता. फलटण, जि. सातारा), विकास दादाराम मोहिते (रा. केंजळ, ता. वाई, जि. सातारा) यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. साधारण दीड महिन्यापूर्वी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नाना कोळेकर व दिगंबर भापकर हे फिर्यादीच्या घरी आले होते. कोळेकर याने दिगंबर याला, ह्य६ फुटांपेक्षा जास्त उंचीची मुलगी पूजा करण्यासाठी एका दिवसासाठी पाहिजे आहे. याबदल्यात सात ते आठ तोळे सोने मुलीला पूजेमधे घालतो, ते मुलीला मिळेल. तुला दोन लाख देतो,ह्ण असे कबूल केले. यानंतर कोणतीच प्रतिक्रिया न आल्याने आरोपी पुन्हा मुलीच्या मामाकडे गेले. ह्यतुझी भाची पूजेसाठी दे. त्यासाठी मुलीला ७-८ तोळे सोने देतो, ७ ते ८ लाख रुपये रोख देतो,ह्ण अशी आॅफर दिली. मामाने मुलीच्या वडिलांकडे जाऊन याबाबत विचारणा केली. इतर नातेवाइकांना ही बाब कळविण्यात आली. पैसे देऊन काय अघोरी पूजा करणार काय? या भीतीने मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे चौकशीची तक्रार केली.पोलिसांनी चौकशीसाठी पहिल्या चार जणांना बोलावले. त्यांच्याकडून नाळे व मोहिते यांची नावे पुढे आली. त्यांच्याच सांगण्यावरून वरील चौघांनी कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे. सहा जणांवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम २०१३चे कलम २ (१) ख २ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहरचे पोलीस निरीक्षक विजय जाधव गुन्ह्याचा तपास करीत आहेत. दरम्यान, तीन दिवसांपासून या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता; त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू होती. गुरुवारी (दि. २६) अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव, जिल्हा सचिव भारत विठ्ठलदास, तालुकाध्यक्ष बाळकृष्ण भापकर, नेताजी खंडागळे सकाळीच फिर्यादीच्या कुटुंबीयांना भेटून पोलीस ठाण्यामधे आले होते. या घटनेबाबत त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याबाबतचे निवेदन पोलिसांकडे देण्यात आले. अंनिसचे कार्यकर्ते, पत्रकार, नागरिकांचे मत जाणून घेऊन अखेर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. सतर्कतेमुळे मुलीचे प्राण वाचलेआरोपींनी पैशाचा पाऊस पाडण्यासाठी मुलीची मागणी केली होती. अल्पवयीन मुलीला पूजेसाठी वडिलांनी बसवण्यास संमती दिल्यानंतर नरबळीचा धोका होता. मात्र, मुलीचे काका भगवान धायगुडे यांच्या सतर्कतेमुळे मुलीचे प्राण वाचले. आरोपींना ताब्यात घेतले असल्याने त्यांनी यापूर्वी नरबळीसारख्या घटना केलेल्या असल्यास उघड होण्याची शक्यता आहे.|