शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

हुंडा मागणे भोवले; तीन जणांना अटक

By admin | Updated: May 9, 2016 01:53 IST

मूर्तिजापूर पोलिसांची कारवाई; तीन आरोपींना पोलीस कोठडी.

अकोला: तब्बल १0 लाख रुपये घेऊनही पाच लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केल्याप्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी मानोर्‍या तालुक्यातील तिघांना शनिवारी अटक केली तर गुन्हा दाखल झालेले अन्य तीन जण फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उत्तम वसराम पवार (५५ रा. गौरखेडी) यांच्या मुलीचा विवाह देवानंद हेमंत चव्हाण (३0 रा. पाळोदी ता. मानोरा जि. वाशिम) याच्याशी हुंड्याविना निश्‍चित करण्यात आला होता. २८ मार्च रोजी साक्षगंध झाले. वधुपित्याने वर देवानंदला पाच ग्रॅमची अंगठी व पाच हजारांचे कपडे दिले होते. साक्षगंध आटोपल्यानंतरही लग्न झाले नाही. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली. नवदेव पोहोचलाच नाही.३0 एप्रिलला आयोजित लग्नसोहळ्याला नवरदेव आलाच नाही. त्यामुळे संतापलेल्या वधुपक्षाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. वधुपिता उत्तम वसाराम पवार यांनी संबंधितांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ४२0 (फसवणूक) व हुंडा प्रतिबंधक कायद्याचे कलम ३,४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मूर्तिजापूरचे ठाणेदार आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत बोरोकार, गणेश ढोके करीत आहेत.आरोपी पोलीस कोठडीतगुन्हा दाखल झाल्यानंतर ७ मे रोजी आरोपी भारत चंदुसिंह चव्हाण (४६), गणेश चंदुसिंह चव्हाण (५२) रा. पाळोदी यांना अटक करण्यात आली, तर नवरदेव देवानंद हेमंत चव्हाण (३0) याला ८ मे रोजी नरखेड येथून जेरबंद करण्यात आले. या तिघांना १३ मेपर्यंंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी रवि हेमंत चव्हाण, रीता रवि चव्हाण, देवकाबाई हेमंत चव्हाण यांचा पोलीस शोध घेत आहेत.