शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जामदरा येथील शेतक-यांना कृषी विभाग देणार दिलासा!

By admin | Updated: March 14, 2016 02:07 IST

खरीप हंगामावर बहिष्कार टाकण्या-या जामदारा ग्रामस्थांची भेट दिली.

वाशिम: गत तीन वर्षांपासून सातत्याने पडत असलेल्या दुष्काळामुळे चक्क खरीप हंगामावरच बहिष्कार टाकणार्‍या जामदरा गाववासीयांच्या कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी समस्या जाणून घेतल्या असून, त्याचे निराकरण करण्यात येणार आहे. जामदरा येथील दुष्काळी परिस्थितीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे. मानोरा तालुक्यातील जामदरा या गावातील शेतकर्‍यांनी दुष्काळाने त्रस्त झाल्याने यावर्षीच्या आगामी खरीप हंगामावरच बहिष्कार टाकला. दरवर्षीच शेतात लाखो रुपयांचा उत्पादन खर्च करायचा आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे होत असलेल्या अल्प उत्पन्नाने शेतकर्‍यांच्या हाती भोपळाच राहत आहे. शेतकर्‍यांनी बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत कृषी विभागाने या गावात जावून शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या. मानोरा तालुका कृषी अधिकार्‍यांनी त्यांच्या चमूसह गावात जावून गावातील शेतीची पाहणी केली, तसेच शेतकर्‍यांच्या समस्या कोणत्या आहेत, त्यांनी का असा टोकाचा निर्णय घेतला, याची माहिती जाणून घेतली. याचा अहवाल तयार करण्यात आला असून, अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार आहे. या गावातील शेतकर्‍यांनी दरवर्षीच कमी उत्पन्न होत असल्याने तोट्यात शेती करण्याऐवजी शेतीच न करण्याचा निर्णय घेतला. याबाबत बोलताना जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले, की त्यानंतर गावातील पीक पद्धती बदलणे गरजेचे आहे. त्यामुळे गावातील शेतकर्‍यांशी बोलून त्यांना पीक पद्धतीत बदल करण्याचे आवाहन करण्यात येईल. शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. गावकर्‍यांनी पीक पद्धतीत बदल करून उत्पादन घेण्याची गरज आहे.