मुंबई : सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येचा तपास आता सीबीआयचा दिल्ली विभाग करणार असल्याची माहिती सोमवारी उच्च न्यायालयाला देण्यात आली़शेट्टी यांची जानेवारी २०१० मध्ये पुणे येथे हत्या झाली़ न्यायालयाच्या आदेशानुसार याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला़ सीबीआयचा पुणे विभाग हा तपास करीत होता़ मात्र हा विभाग दबावाखाली याचा तपास करीत असल्याचा आरोप करीत शेट्टी यांचा भाऊ संदीप यांनी न्यायालयात धाव घेतली़ त्यावरील सुनावणीत सीबीआयच्या वतीने वरील माहिती देण्यात आली़ (प्रतिनिधी)
सतीश शेट्टी यांच्या हत्येचा तपास दिल्ली करणार
By admin | Updated: March 10, 2015 04:22 IST