शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
4
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
5
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
6
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
7
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
8
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
9
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
10
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
11
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
12
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
13
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
16
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
17
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
18
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
19
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
20
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!

अनधिकृत धार्मिकस्थळे आॅगस्ट २०१६पर्यंत हटवा

By admin | Updated: February 19, 2016 03:19 IST

अनधिकृत धार्मिकस्थळे हटवण्याची कारवाई संथ गतीने सुरू असल्याची टीका करत उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व अनधिकृत धार्मिकस्थळे आॅगस्ट २०१६पर्यंत हटवण्याची मुदत राज्य सरकार आणि महानगरपालिकांना दिली आहे.

मुंबई : अनधिकृत धार्मिकस्थळे हटवण्याची कारवाई संथ गतीने सुरू असल्याची टीका करत उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व अनधिकृत धार्मिकस्थळे आॅगस्ट २०१६पर्यंत हटवण्याची मुदत राज्य सरकार आणि महानगरपालिकांना दिली आहे.अनधिकृत धार्मिकस्थळे हटवण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २००९मध्ये सर्व राज्यांना आदेश दिला. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात होत नसल्याने सरकारला त्यावर तातडीने पावले उचलण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका ‘सोसायटी फॉर फास्ट जस्टिस’ या स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठापुढे होती.गेल्या वर्षी खंडपीठाने सर्व अनधिकृत धार्मिकस्थळे हटवण्यासाठी राज्य सरकार व राज्यातील सर्व महापालिकांना सहा महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत मे महिन्यात संपत आहे. मात्र राज्य सरकारची कारवाईची गती पाहता खंडपीठाने आॅगस्ट २०१६पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ‘८८१ धार्मिकस्थळे अनधिकृत असून, आतापर्यंत ४१ बांधकामे भुईसपाट करण्यात आली. ११ बांधकामे जानेवारीत हटवण्यात आली. ८८१पैकी ८६२ बेकायदेशीर धार्मिकस्थळे महापालिकांच्या हद्दीत येतात. तर एकट्या मुंबईत ४८२ अशा प्रकारची बांधकामे आहेत. आॅगस्टपर्यंत सर्व बांधकामे हटवण्यात येतील,’ असे मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी खंडपीठाला सांगितले. तर मुंबई महापालिकेतर्फे ‘आतापर्यंत ४ धार्मिकस्थळांवर कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित ४७८ धार्मिकस्थळे आॅगस्टपर्यंत पाडण्यात येतील; त्याशिवाय २२१ बांधकामे नियमित करण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. २०७ धार्मिकस्थळे नियमित करण्यात आली आहेत. १४ जणांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे आणि ९ धार्मिकस्थळे स्थलांतरित करण्यात येतील,’ अशी माहिती अ‍ॅड. साखरे यांनी खंडपीठाला दिली. (प्रतिनिधी)