शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शाळा परिसरातील टपऱ्या हटवा

By admin | Updated: April 27, 2015 04:02 IST

शाळा, महाविद्यालयाच्या ९० मीटरच्या परिसरात पानटपऱ्या असल्यास शिक्षकांनी अथवा पालकांनी शिक्षण विभागाकडे ई-मेल, पत्राद्वारे त

मुंबई : शाळा, महाविद्यालयाच्या ९० मीटरच्या परिसरात पानटपऱ्या असल्यास शिक्षकांनी अथवा पालकांनी शिक्षण विभागाकडे ई-मेल, पत्राद्वारे तक्रार नोंदवल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. इंडियन कॅन्सर सोसायटीचा ६४ वा वर्धापन दिन शनिवारी २५ एप्रिलला साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ‘बी स्मार्ट, डोन्ट सार्ट’ ही शॉर्टफिल्म विनोद तावडे आणि अभिनेता वरूण धवन यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आली. यावेळी तावडे बोलत होते. शाळा, महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआमपणे विक्री असल्यामुळे विद्यार्थी दशेतच अनेकांना व्यसन जडते. लहान वयात मुले चोरून धूम्रपान करू लागतात. व्यसनांचे प्रमाण वाढल्यास भविष्यातील पिढीचे आरोग्य धोक्यात येते. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात असलेल्या टपऱ्यांवर आम्ही कारवाई करतच आहोत. पण, यात शिक्षक, पालकांचा देखील सक्रिय सहभाग असावा. मुलांमध्ये जनजागृती व्हायला पाहिजे. त्यासाठी ही शॉर्टफिल्म महत्त्वाची आहे, असेही तावडे यांनी नमूद केले.अभिनेता वरूण धवनने यावेळी स्वत:चा अनुभव सांगितला. तो म्हणाला, मी एक अभिनेता आहे. यामुळे मला एखाद्या व्यक्तिरेखेसाठी धूम्रपान करावे लागते. पण प्रत्यक्षात मी नेहमीच धूम्रपानापासून लांब राहतो. धूम्रपान धोकादायक असल्याचे मला लहान वयातच समजले. धूम्रपान आरोग्यास हानिकारक असल्याने करू नये, असे सगळीकडेच बोलले जाते. पण, प्रत्यक्षात हा वैयक्तिक निर्णय असतो. म्हणून प्रत्येकाने स्वत: धूम्रपानापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला पाहिजे. अनेकजण हे लहान वयातच मित्र मैत्रिणींच्या दबावामुळे धूम्रपानाच्या आहारी जातात. यामुळेच अनेकांचे आरोग्य धोक्यात येते. विशीपर्यंतच मुलांना धूम्रपानाचे व्यसन जडते. तिशीच्या आसपास अथवा तिशी उलटल्यावर साधारणत: हे व्यसन जडत नसल्याचे टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ. अनिल डिक्रूझ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)