शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विलंबाच्या रिडिंगमुळे ग्राहकांना फटका

By admin | Updated: May 20, 2016 02:33 IST

वीजमीटरचे रिडिंग वेळेवर न घेतल्याने शहरातील लाखो ग्राहकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे

पिंपरी : वीजमीटरचे रिडिंग वेळेवर न घेतल्याने शहरातील लाखो ग्राहकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. सांगवी विभागातील महावितरणच्या सावळ्या गोंधळाचा फटका नागरिकांना बसला असून, यास कारणीभूत असणाऱ्या बिलांचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करून नागरिकांचे पैसे परत करावेत, अशी मागणी होत आहे. महावितरणतर्फे अनेक भागांत वेळेवर वीज बिलवाटप होत नाही. तसेच, मीटर रिडिंग मुदतीनंतर घेतले जाते. वीजबचतीच्या अनेक उपाययोजना करूनही केवळ कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. उशिरा रिडिंग घेतल्याने दुप्पट ते तिप्पट रकमेचे बिल भरावे लागत आहे. या महिन्यात आलेली बिले पाहून नागरिकांचे डोळे पांढरे झाले आहेत. याबाबत ‘वाढीव बिलांमुळे नागरिकांना शॉक’ हे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. नियमित योग्य प्रमाणात वापर असूनही केवळ उशिरा रिडिंग घेतल्याने नागरिकांना दुप्पट ते तिप्पट दराच्या वाढीव बिलाचा भार पेलावा लागतो. बिल मुदतीनंतर मिळाले किंवा मिळालेच नाही, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यास दखल घेतली जात नाही. महावितरणच्या आॅनलाइन संकेतस्थळावर तपासा, मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करून घ्या, कॉल सेंटरशी संपर्क साधा, अशी उत्तरे नागरिकांना देण्यात येतात. याबाबचे वृत्त प्रकाशित केल्यानंतरही अधिकारी दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे. यावरून बिलिंगचे ठेकेदार आणि अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्याचे दिसून येत आहे. वीज वापराचा स्लॅब ठरवून दिला आहे. मात्र, मार्च, एप्रिल, मे महिन्याच्या दहा तारखेच्या आत रिडिंग घेणे अपेक्षित असताना दहा ते बारा दिवस उशिराने रिडिंग घेतले. त्यामुळे बिल दुप्पट आले आहे. बिलिंगचे काम खासगी ठेकेदाराकडे दिले आहे. त्यांच्यावर अधिकाऱ्यांचा वचक नसल्याचा फटका नागरिकांना बसला आहे. वाढीव बिले रद्द करून नवीन बिले द्यावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे ग्राहकांनी सांगितले. सांगवी विभागातील वाढीव रिडिंगची माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे. दोन महिन्यांची तुलना केली असता, ही वाढ ४० ते ५० टक्के असल्याचे दिसून आले.(प्रतिनिधी)