शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरीच्या पदवीसोबतच मिळणार जात पडताळणी दाखला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 00:21 IST

जात पडताळणी समितीच्या दिरंगाईमुळे ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रमास राखीव जागेवर हंगामी प्रवेश दिलेल्या ठाणे येथील एका आदिवासी विद्यार्थिनीला ता पाच वर्षांनी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर डॉक्टरकीची पदवी व जात पडताळणी दाखला एकदमच मिळणार आहे!

मुंबई : जात पडताळणी समितीच्या दिरंगाईमुळे ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रमास राखीव जागेवर हंगामी प्रवेश दिलेल्या ठाणे येथील एका आदिवासी विद्यार्थिनीला ता पाच वर्षांनी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर डॉक्टरकीची पदवी व जात पडताळणी दाखला एकदमच मिळणार आहे!‘ठाकूर’ या आदिवासी जमातीच्या या विद्यार्थिनीचे नाव लीना संजीव ठाकूर असे असून तिने मुंबईतील सरकारी ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयातून यंदा ‘एमबीबीएस’ची अंतिम परीक्षा दिली आहे. वैद्यकीय प्रवेश घेताना तिने जातीचा दाखला पडताळणीसाठी ठाणे येथील कोकण विभागीय समितीकडे पाठविला होता. समितीने डिसेंबर २०१६ मध्ये तोफेटाळला म्हणून लीना हिने याचिका केली. न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने लीना हिचा ‘ठाकूर’ जातीचा दावा फेटाळण्याचा समितीचा निर्णय रद्द केला व तिला १० दिवसांत पडताळणी दाखला द्यावा, असा आदेश दिला. तसेच जात पडताळणी दाखला नसूनही हंगामी प्रवेश दिलेल्या लीना हिने आम्हीच दिलेल्या आधीच्या आदेशांनुसार ‘एमबीबीएस’चा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असल्याने ग्रँट महाविद्यालय व आयुर्विज्ञान विद्यापीठाने तिच्या अंतिम परीक्षेचा राखून ठेवलेला निकाल जाहीर करावा आणि त्यानुसार तिला प्रमाणपत्र द्यावे, असेही निर्देश खंडपीठाने दिले. परिणामी लीनाला डॉक्टरकीची पदवी व जात पडताळणी दाखला हे दोन्ही आता एकदमच मिळेल.या सुनावणीत याचिकाकर्त्या विद्यार्थिनीसाठी अ‍ॅड. आर. के. मेंदाडकर, कोमल गायकवाड व तानाजी जाधव यांनी, सरकारसाठी सहाय्यक सरकारी वकील व्ही. एम. माळी तर आरोग्य विद्यापीठासाठी अ‍ॅड. राजशेखर गोविलकर यांनी काम पाहिले.समितीचे ये रे माझ्या मागल्याकल्याण येथील नारायण गणेश खैरनार या विद्यार्थ्याने केलेल्या याचिकेत न्यायालयाने याच कोकण विभागीय समितीवर कडक ताशेरे ओढून तिच्या सदस्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये दंड केला होता. कुटुंबातील रक्ताच्या अन्य नातेवाईकांना (वडील, चुलता, भावंडे इ.) आधी पडातळणी दाखला दिलेला असूनही अर्जदारास तो नाकारण्याच्या समितीच्या मनमानी कारभाराने न्यायालय संतापले होते. तरही कोणतीही सुधारणा न करता समितीने लीना हिच्या प्रकरणातही पुन्हा तेच केले होते. कळस म्हणजे लीनाला दाखला नाकारल्यावर समितीने तिचा धाकटा भाऊ दर्शन यास पडताळणी दाखला दिला होता.

टॅग्स :doctorडॉक्टर