शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पाच जिल्ह्यांत १८०८ गुन्ह्यांची घट - विश्वास नांगरे-पाटील

By admin | Updated: January 20, 2017 19:50 IST

कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील गुन्ह्यांचा आढावा घेतला असता गंभीर गुन्ह्यांपैकी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, गर्दी-मारामारी, बलात्कार, विनयभंग

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 20 -  कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील गुन्ह्यांचा आढावा घेतला असता गंभीर गुन्ह्यांपैकी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, गर्दी-मारामारी, बलात्कार, विनयभंग, दुखापत असे सुमारे २६ हजार ८४२ गुन्हे दाखल असून त्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत १८०८ गुन्ह्यांची घट झाली आहे, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
नांगरे-पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र हा आर्थिकदृष्ट्या सधन भाग असल्याने येथील स्थानिक गुन्हेगारांबरोबरच शेजारील राज्यांतील गुन्हेगारांचे आव्हान पोलिसांसमोर होते. आपल्या अधिकाराखालील पोलिस अधिकारी व कर्मचाºयांना विश्वासात घेऊन अशा गुन्हेगारांबाबत कायद्याने दिलेले अधिकार वापरण्याकरीता प्रोत्साहित करून पाठपुरावा केला. त्यामध्ये मोक्कांतर्गत एकूण २६ कारवाया करून १९६ आरोपींविरुद्ध कारवाई केली तसेच एमपीडीए कायद्यांतर्गत १८ गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यासाठी प्रस्ताव दिले आहेत. महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत ‘कलम ५५’ नुसार ४०, कलम ५६-२१६, कलम ५७-११२ कारवाया करत गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. पुणे ग्रामीणमधील अट्टल गुन्हेगार शाम दाभाडे व त्याच्या साथीदारांना पोलिस चकमकीत मारल्याने तिथे आता शांतता आहे. यावर्षी १५२ फरार व ४१३ पाहिजे असलेले आरोपी पकडले आहेत. गुन्हेगारांकडे असणारी शस्त्रे असे एकूण ८६ गुन्हे दाखल करून परदेशी-देशी बनावटीची पिस्टल ५१, रिव्हॉल्व्हर १०, गावठी कट्टा १०, बंदूक ५, काडतुसे १२४ जप्त केली आहेत. शस्त्र पुरवठा करणा-यांवरही कारवाई केली आहे. परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण जिल्ह्यांत २०१६ मध्ये २६ हजार ८४२ गुन्हे दाखल असून गतवर्षीची तुलना करता १८०८ गुन्ह्यांची घट झाली आहे. तपासाची योग्य दिशा ठरवून तपासी अंमलदारांना वरिष्ठ अधिका-यांतर्फे मार्गदर्शन केल्याने न्यायालयात चालणा-या खटल्यांमध्ये गुन्हे शाबित होण्याचे प्रमाण ४१ टक्के आहे तसेच न्यायालयाकडून समन्स बजावणीचे प्रमाण ९० व वॉरंटचे प्रमाण ८२ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे (कोल्हापूर), दत्तात्रय शिंदे (सांगली), संदीप पाटील (सातारा), वीरेश प्रभू (सोलापूर ग्रामीण), अप्पर पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे (पुणे ग्रामीण) हे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
.............................
गुन्हेगारांचे आदान-प्रदान 
गुन्हेगारांवर मानसिक दबाव ठेवणे, त्यांची माहिती सर्व पोलिस ठाण्यांना व्हावी, याकरिता गुन्हेगार आदान-प्रदान योजना चालू केली आहे. परिस्थितीमुळे काही तरुण गुन्हेगारीकडे वळतात. त्यांना पुनर्वसनासाठी समुपदेशन होऊन समाजामध्ये चांगले जीवन जगता यावे यासाठी ‘आरोपी दत्तक योजना’ सुरू केली आहे. त्यामध्ये ‘एका पोलिस कर्मचाºयास एक आरोपी’ अशी दत्तक योजना राबविली आहे. 
-------------------------------
१००८ ग्रामपंचायतींचे ठराव
अवैध धंदे बंद करण्याबाबत जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांना कडक सूचना दिल्या आहेत. यावर्षी २३७३ गुन्हे दाखल करून गुन्ह्यांच्या मुळाशी असलेल्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केली आहे. हे धंदे बंद करण्यासाठी परिक्षेत्रातील १००८ ग्रामपंचायतींनी ठराव सादर केले आहेत. 
---------------------------------
मोक्का लावलेल्या टोळ्या : (कंसात आरोपी संख्या)
कोल्हापूर - एस. टी. ऊर्फ स्वप्निल तहसीलदार (१२), अमोल अशोक माळी (८), राजवर्धन पाटील (१०), सांगली - एम. डी. ऊर्फ महंमद नदाफ (८), प्रशांत पवार (१३), विजय शिंदे (५), मधुकर वाघमोडे (६), सातारा - योगेश अहिवळे (११), रॉयल सिक्वेरा (६), सोलापूर  - मनिष काळे (३), पुणे - शाम दाभाडे (१०), सचिन इथापे (१०), अविनाश भोसले (७), गणेश अगरवाल (६). 
----------------------------
हद्दपार प्रमुख गुन्हेगार टोळ्या - (कंसात आरोपी संख्या)
कोल्हापूर - बबन लाला कवाळे (४), सलीम यासीन मुल्ला (६), शंकर भास्कर (७), शंकर पवार (५), सांगली - रणजित पाटील (५), सतीश बाळाराम जाधव (२), सतीश पवार (४),सातारा - समीर कच्छी (५), जब्बार पठाण (६), यासीन शेख (६), सोलापूर - रूपला किसन राठोड (६), पुणे - मंगेश देशमुख (३), नीलेश कुर्लप (११), पप्पू राजापूरे (७). 
---------------------------
परिक्षेत्रातील गुन्ह्यांची आकडेवारी (२०१६)
खून ३७५, खुनाचा प्रयत्न ३०७, दरोडा ८६, जबरी चोरी  ५०२, घरफोडी १५७३, चोरी ६०१४, ठकबाजी ८१९, गर्दी-मारामारी १७८०, दुखापत ३८६९, बलात्कार ५४६, विनयभंग १३८८, सार्वजनिक ठिकाणी हल्ला ३८५ यासह इतर.