शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाचे खापर मुख्यमंत्र्यांवर नको

By admin | Updated: May 19, 2014 00:18 IST

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा देण्याची मागणी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक मानकर यांनी आत्मचिंतन बैठकीत रविवारी केली.

पुणे : लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा देण्याची मागणी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक मानकर यांनी आत्मचिंतन बैठकीत रविवारी केली. त्याचे पडसाद तत्काळ उमटले. कार्यक्षम व स्वच्छ प्रतिमेच्या मुख्यमंत्र्यांवर पराभवाचे खापर फोडणे चुकीचे आहे. काँग्रेस उमेदवारांच्या पराभवाची जबाबदारी सामूहिक आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया आमदार व पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. पुण्यातील विकास आराखडा, मेट्रो, पार्किंग नियमावली असे अनेक विषय मुख्यमंत्री चव्हाण यांनी मार्गी लावले आहेत. स्वच्छ प्रतिमा व कार्यक्षम नेतृत्व म्हणून सर्व जनतेला त्यांची ओळख आहे. स्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. पराभव हा कोणा एकट्यामुळे होत नसतो, ही सामूहिक जबाबदारी आहे. त्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे आमदार विनायक निम्हण यांनी सांगितले. देशभरातील मोदी लाटेमुळे काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्याचे एकट्या मुख्यमंत्र्यांवर खापर फोडणे योग्य होणार नाही. राज्यातील लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी अनेक सभा घेतल्या, तसेच त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी चुकीची आहे. त्यावरती पक्षश्रेष्ठी निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सदस्य गोपाळ तिवारी यांनी व्यक्त केली. दरम्यान, राजीनामा मागण्याच्या भूमिकेला कॉँग्रेसच्या इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला. (प्रतिनिधी)