शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

जंगलतोडीमुळे कोसळताहेत दरडी

By admin | Updated: July 20, 2015 01:44 IST

ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचा कमी-अधिक होणारा जोर, जंगलातील कमी होणारी माती, वृक्षतोड आणि विकास कामांमुळे कापले जाणारे डोंगर; अशा अनेक

सचिन लुंगसे, मुंबईग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचा कमी-अधिक होणारा जोर, जंगलातील कमी होणारी माती, वृक्षतोड आणि विकास कामांमुळे कापले जाणारे डोंगर; अशा अनेक घटनांमुळे दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची भीती पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. संबंधित ठिकाणी वेगाने जाणाऱ्या वाहनांचे हादरेही अशा दरडींना बसतात. त्यामुळे अशा घटना वाढतच राहतात, असेही पर्यावरणतज्ज्ञांनी म्हटले आहे.मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटजवळ रविवारी दरड कोसळल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर तीनजण गंभीर जखमी झाले. अशा घटना पावसाळ्यात वारंवार होत असून, या घटनांशी बिघडणाऱ्या नैसर्गिक असमतोलाचा संबंध पर्यावरण तज्ज्ञांनी जोडला आहे.पर्यावरणतज्ज्ञ अ‍ॅड. गिरीश राऊत यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, दरडी कोसळण्याच्या घटनांना येथील जंगलतोड आणि डोंगरतोड कारणीभूत आहे. जंगलतोड झाल्यानंतर मूळांनी धरून ठेवलेली माती विस्कळीत होते. ती मुख्य प्रवाहापासून तोडली जाते. जेव्हा विकासकामे म्हणजे रस्त्यांसाठी काटकोनात डोंगर तोडले जातात, तेव्हा डोंगरांची यंत्रणा खिळखिळी होते. डोंगर अथवा दरडीमध्ये भेगा निर्माण होतात. त्या भेगांमध्ये पावसाचे पाणी शिरते. शिवाय अशा दरडी अथवा डोंगरांवर उन्हाचाही परिणाम होत असतो. पावसासह उन्हाच्या माऱ्यामुळे खडकावरील मातीचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे खडक उघडा पडतो. अशा अनेक कारणांनी डोंगराची अथवा दरडीची यंत्रणा खिळखिळी झाली, की त्या आपोआप कोसळू लागतात. कोकणातील दरडी वारंवार कोसळण्यामागेही हीच कारणे आहेत.