शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Bacchu Kadu : बच्चू कडूंना मंत्रिपद मिळणार का?; नाराजीवर दीपक केसरकर स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 11:22 IST

Deepak Kesarkar And Bacchu Kadu : कॅबिनेट मंत्रिपदे ही शिवसेना आणि भाजपामध्ये देण्यात आली. यामुळे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू नाराज झाले आहेत.  प्रसारमाध्यमांसमोर आपली उघड नाराजी व्यक्त केली.

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी करण्यात आला. परंतू यामध्ये अपक्ष आमदारांना स्थान देण्यात आले नाही. कॅबिनेट मंत्रिपदे ही शिवसेना आणि भाजपामध्ये देण्यात आली. यामुळे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू नाराज झाले आहेत.  प्रसारमाध्यमांसमोर आपली उघड नाराजी व्यक्त केली. शिंदे सरकारमध्ये सामाजिक न्याय, अपंग कल्याण आणि अमरावतीचं पालकमंत्रीपद मिळायला हवं, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती. यानंतर आता दीपक केसरकर यांनी बच्चू कडू नाराज असल्याच्या प्रश्नावर भाष्य केलं आहे. 

बच्चू कडूंना (Bacchu Kadu) अतिशय चांगलं खातं मिळालेलं दिसेल, लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी "बच्चू कडू आमचे जवळचे नेते आहे. आमच्या मित्रपक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा योग्य तो मान महाराष्ट्रात ठेवला जाईल. लवकरच आम्ही सर्वजण जाऊन त्यांची भेट घेऊ. त्यांना अतिशय चांगलं खातं हे विस्तारानंतर मिळालेलं तुम्हाला दिसेल" असं म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने नाराज आहात का? असा प्रश्न बच्चू कडू यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी नाराजी आहे, पण एवढीही नाही की दुसरीकडे जाऊ. ही क्षणीक नाराजी आहे. सर्वच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता तर वेगळी गोष्ट असती. काही मुद्द्यांना घेऊन आम्ही शिदेंना पाठिंबा दिला होता. त्यांनी काही सांगितलेले म्हणून आम्ही मागितले. शिंदेंनी मंत्रिपद देण्याचे आम्हाला आश्वासन दिले होते. मंत्री बनवितो म्हणालेले, तर बनवायला हवे होते. परंतू पहिल्या विस्तारात मिळाले नाही. पहिल्या नाही निदान शेवटच्या तरी देतील. नाही दिले तर विचार करू, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली. 

हे राजकारण आहे. यात दोन आणि दोन चार होत नाही, शून्यही होऊ शकतो. अडीच वर्षांनीदेखील मंत्रिमडळ विस्तार होऊ शकतो. काहीही सांगू शकत नाही, असे कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदे समर्थक अपक्ष आमदारांना विस्तारात स्थान न दिल्याबाबत चर्चा केली. यावर सप्टेंबरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा प्रहारला मंत्रिपद दिले जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे समजते. “फार महत्त्वाचे निर्णय केले पाहिजे त्यासाठी आम्ही आग्रही राहू. मंत्रीपदाचा विषय तो आमचा हक्का आणि तो आम्ही मिळवणारच. त्याबद्दल शंका नाही. ते आम्हाला मिळणारही आहे,” असे बच्चू कडू मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच्या बैठकीला जाताना म्हणाले होते. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Eknath Shindeएकनाथ शिंदेBacchu Kaduबच्चू कडूCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार