शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
2
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
3
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
4
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
5
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
6
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
7
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
8
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
9
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
10
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
11
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
12
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
13
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
14
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
15
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
16
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
17
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
18
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
19
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
20
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
Daily Top 2Weekly Top 5

दारू विक्रीत निम्म्याने घट

By admin | Updated: June 7, 2017 04:48 IST

महामार्गांपासून अर्धा किमी अंतरावरील परमीट रूम रद्द झाल्याने दारू विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली

विलास बारी । लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : महामार्गांपासून अर्धा किमी अंतरावरील परमीट रूम रद्द झाल्याने दारू विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गत एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत तब्बल ४२९ कोटींचा महसूल कमी झाला आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात देशी-विदेशी व बीअरच्या विक्रीत तब्बल ६० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग या ठिकाणी होत असलेल्या दारूविक्रीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले, असा निष्कर्ष काढत सर्वोच्च न्यायालयाने महामार्गांपासून ५०० मीटर अंतर परिसरात कोणत्याही प्रकारे दारू विक्री करण्यास बंदी घालत १ एप्रिलपर्यंत ही दुकाने हटवण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार परमिट रूम, वाइन शॉप व बीअर शॉपी दुकाने बंद झाली. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा महसूल घटला आहे. गेल्या वर्षी एप्रिल व मे २०१६ दरम्यान ९८१ कोटी ६३ लाख ८ हजारांचा महसूल मिळाला होता. मात्र यंदा या दोन महिन्यांत केवळ ५५२ कोटी ४५ लाख ३५ हजारांचा महसूल या विभागाला मिळाला आहे.>ठाणे, नाशिक व पुणे विभागाला सर्वाधिक फटकाराज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यात ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद व नागपूर असे सहा विभाग आहेत. या निर्णयाचा ठाणे, नाशिक व पुणे विभागाला सर्वाधिक फटका बसला आहे. औरंगाबाद विभागातील अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या प्रकल्पांमुळे महसूल वसुली काही प्रमाणात आवाक्यात आहे. विभाग२०१७२०१६ठाणे११५१.४११२७०८.१९नाशिक७२८४.६५१३३५९.१०पुणे३२२१.३१२१४६९.९३कोल्हापूर५४०५.८९७९२७.२९औरंगाबाद३३१०५.४१३७८८२.१०नागपूर५०७६.६८४८१६.४७एकूण५५२४५.३५९८१६३.०८(टीप-रक्कम लाखात)