शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

हज २०१९ ची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 05:21 IST

मुंबई : हज २०१९ची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी बुधवारी हज हाउसमध्ये केली. २०१८ची हज यात्रा ...

मुंबई : हज २०१९ची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी बुधवारी हज हाउसमध्ये केली. २०१८ची हज यात्रा समाप्त झाल्यानंतर, अवघ्या महिन्याभरात पुढील वर्षीच्या यात्रेची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व प्रक्रियांना पुरेसा वेळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.१८ आॅक्टोबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत हजसाठी अर्ज भरण्याची आॅनलाइन प्रक्रिया होईल. त्यानंतर २२ आॅक्टोबरपासून आॅफलाइन प्रक्रिया सुरू होईल. यंदाची हज यात्रा १०० टक्के अनुदानमुक्त व १०० टक्के डिजिटल असेल, अशी माहिती नक्वी यांनी दिली. या वेळी अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख, हज समितीचे उपाध्यक्ष शेख जिना नबी आदी उपस्थित होते.हज यात्रेवरील वाढीव ३ टक्के जीएसटी रद्द करण्याची शिफारस जीएसटी काउन्सिलला केल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यमंत्री कांबळे यांनी यात्रेवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी केली होती. हज अनुदानाची रक्कम अल्पसंख्याक विद्यार्थ्यांवर खर्च करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. राज्य हज समितीचे माजी अध्यक्ष हाजी इब्राहिम शेख यांनी हज यात्रेवरील जीएसटी पूर्णत: रद्द करण्याची मागणी केली. हज समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासी इमारत उभारण्याची मागणी त्यांनी केली.यंदा हजची घोषणा लवकर केल्यामुळे निवास व्यवस्था, विमान व्यवस्थेसाठी जास्त वेळ मिळेल. हवाई प्रवासाची निविदा प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून निवास व्यवस्था जानेवारीपासून सुरू होईल. देशातील २१ विमानतळांवरून यात्रेकरू हजला जाणार आहेत.

टॅग्स :Haj yatraहज यात्रा