शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षणाचा निर्णय आमच्या हातात नाही; जानकरांनी हात झटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 05:55 IST

१६ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे रासपचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

मुंबई : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर पाच वर्षांपूर्वी राजकीय वातावरण ढवळून काढणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आता आरक्षणाचा मुद्दा आमच्या हातात नसल्याचे सांगत हात झटकले आहेत. सरकारने सकारात्मक प्रतिज्ञापत्रक न्यायालयात सादर केले असून आता न्यायालयाने निर्णय दिला तर आरक्षण देऊ, असेही त्यांनी सांगितले.

१६ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे रासपचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ग्रामविकास मंत्री पंकजामुंडे, आमदार राहुल कुल, प्रवीण दरेकर, बाळासाहेब दोडतले यांच्यासह रासपचे पदाधिकारी उपस्थित होते. धनगर आरक्षणाचा निर्णय न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगतानाच धनगरांबाबतच्या निर्णयांना विलंब झाल्याची कबुलीही जानकर यांनी या वेळी दिली.

धनगर आरक्षणाचे वादळ आम्हीच उभे केले, न्यायसुद्धा आम्हीच देणार. राज्यात सत्ता आल्यानंतर आदिवासींना धक्का न लावता त्यांच्या २२ योजना धनगर समाजाला लागू केल्या. एक हजार कोटींचा निधी दिला. काँग्रेस, राष्ट्रवादीने तर ओबीसी समाजाचा वापर कडीपत्यासारखा केला. धनगरांची अवस्था त्याहून वाईट होती. मात्र, भाजप सरकारने दोन कॅबिनेट मंत्री, दोन राज्यमंत्री आणि एक राज्यसभा खासदार देत धनगर समाजाला राजकीय वाटा दिल्याचे जानकर यांनी सांगितले.रासप ही महायुतीचा भाग आहे. पक्षाची जिथे ताकद आहे तिथे तिथे आम्हाला संधी मिळायलाच हवी, असे सांगतानाच आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आम्ही ५७ जागांची मागणी केल्याचे जानकर म्हणाले.

महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांत रासपला मान्यता मिळाली आहे. आणखी दोन राज्यांची भर पडली तर आम्हाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळेल. त्यादृष्टीने उत्तराखंड आणि हरयाणा निवडणुकांसाठी तयारी सुरू असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांसह ज्येष्ठ नेत्यांची अनुपस्थितीरासपच्या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्यातील विविध मंत्री, नेते येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, भाजप नेते अरुण जेटली यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्री आणि आठवले दिल्लीत असल्याने मेळाव्याला येऊ शकले नसल्याचे जानकर यांनी सांगितले.

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणMahadev Jankarमहादेव जानकर