शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनु. जाती उपवर्गीकरणाचा निर्णय लवकरच : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 10:00 IST

न्या. बदर समितीचा अहवाल सरकारला सादर, निर्णय कॅबिनेटमध्ये 

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करून त्यानुसार त्यांना आरक्षण देण्यासंदर्भातील न्या. अनंत बदर समितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी सादर करण्यात आला. या अहवालाची चर्चा लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करून निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींचे अ, ब, क,ड, असे मागासलेपणाच्या आधारावर वर्गीकरण करून त्यानुसार आरक्षणाचा लाभ द्यावा असा निकाल दिलेला होता. मात्र, त्याचे स्वरूप हे राज्याने निश्चित करावयाचे आहे. त्यानुसार तत्कालीन महायुती सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली उपवर्गीकरणाबाबत शिफारशी करण्यासाठी ऑक्टोबर २०२४ मध्ये समिती नेमली होती. या समितीला सप्टेंबर २०२५ मध्ये अहवाल देण्यास सांगितले होते, पण नंतर मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. 

आंदोलनेही झाली होती...मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकाळातही लवकरच उपवर्गीकरण लागू करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, बदर समितीचा अहवाल येत नाही आणि निर्णयदेखील घेतला जात नाही म्हणून काही संघटनांनी आंदोलन सुरू केले होते. तथापि, सोमवारी या बाबतची प्रतीक्षा संपली. 

उपवर्गीकरणाची आवश्यकता का?अनुसूचित जातींना नोकरी आणि शिक्षणामध्ये जे आरक्षण आहे त्या विशिष्ट समाजांनाच अधिक फायदा झाला आणि अनेक जाती त्यापासून वंचित राहिल्याने मागासलेपणाचाही अनुशेष काही जातींबाबत तयार झाला आणि म्हणून उपवर्गीकरणाची आवश्यकता आहे, हा उपवर्गीकरणाचा गाभा आहे.न्या. बदर समितीने अनुसूचित जातींमधील विविध जातींना आजवर मिळालेल्या आरक्षणाच्या संधी, त्यात कोणत्या जाती मागे राहिल्या याबाबतचा तपशील आकडेवारीसह दिला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आ. अमित गोरखे, ‘मित्रा’चे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी तसेच अश्विनी भिडे, श्रीकर परदेशी, हर्षदीप कांबळे हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sub-Categorization Decision Soon: Chief Minister Addresses Scheduled Castes' Reservation

Web Summary : The report regarding sub-categorization of Scheduled Castes was submitted to the Chief Minister. The government will soon discuss and decide on providing reservation benefits based on this sub-categorization, addressing historical disparities in access to opportunities.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGovernmentसरकार