शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

रुंदीकरणबाधितांकडून भाडे न घेण्याचा निर्णय

By admin | Updated: April 26, 2016 03:46 IST

नागरिकांचे पुनर्वसन करण्याचा दावा महापालिकेकडून सातत्याने होत असला तरी ते शासनाच्या धोरणाच्या विसंगत असल्याचा मुद्दा सोमवारी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला.

ठाणे : रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याचा दावा महापालिकेकडून सातत्याने होत असला तरी ते शासनाच्या धोरणाच्या विसंगत असल्याचा मुद्दा सोमवारी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. २००० पूर्वीची बांधकामे असलेल्या आणि महापालिकेच्या रस्ता रुंदीकरण अथवा कोणत्याही विकासकामांमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना शासनाच्या धोरणानुसार २६९ चौ. फुटांचे घर देण्याची तरतूद असताना पालिकेने रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या रहिवाशांना एमएमआरडीएच्या रेंटल हाऊसिंगमध्ये भाड्याने घरे देण्याचा सपाटा लावला आहे. या नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होईल तेव्हा होईल, मात्र आपली हक्काची घरे देणाऱ्या रहिवाशांकडून भाडे न घेण्याचा महत्त्वाचा निर्णय या महासभेत घेण्यात आला. महापालिका हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणात रुंदीकरणाची मोहीम सुरू केली आहे. यामध्ये पोखरण रोड नं. १ आणि २, कापूरबावडी ते बाळकुम, कळव्यातील बुधाजीनगर, शास्त्रीनगर ते हत्तीपूल, ठाणे स्टेशन रोड अशा अनेक रस्त्यांचे सध्या रु ंदीकरण सुरू आहे. नागरिकांनीदेखील या मोहिमेला फारसा विरोध न करता आपली घरे आणि दुकानांचे गाळे सोडले आहेत. यामध्ये बाधित झालेल्या एकाही रहिवाशाला बेघर न करता त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. एमएमआरडीएने ठाणे महापालिकेला हस्तांतरित केलेल्या रेंटल हाऊसिंगमध्ये सध्या या नागरिकांना भाडे आकारून त्यांना घरे राहण्यासाठी दिली आहेत. नगरसेवक नारायण पवार आणि नजीब मुल्ला यांनी प्रशासनाच्या या भूमिकेवर आक्षेप घेऊन धोकादायक किंवा अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी घरे भाड्याने देण्याचे जे धोरण आहे, तेच धोरण रस्ता रु ंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांसाठी कसे लावता येईल, अशा मुद्दा उपस्थित केला. शासनाच्या धोरणानुसार विकासकामांमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणे पालिकेची जबाबदारी असताना त्यांना रेंटलची घरे देऊन भाडे कसे आकारू शकता, असा प्रश्न लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. रु ंदीकरणामध्ये बाधित झालेल्या रहिवाशांकडून भाडे आकारण्यात येऊ नये, असा निर्णय अखेर सोमवारी सभागृहाने घेतला आहे.