शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट कार्डला ‘आधार’ अनिवार्य, एसटी महामंडळाचा निर्णय : दिवाकर रावते यांनी केली घोषणा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 05:31 IST

एसटी महामंडळाच्या माध्यमातून शासनातर्फे देण्यात येणाऱ्या प्रवासी सवलतीसाठी, स्मार्ट कार्डला आधार कार्ड क्रमांक जोडणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे आधार क्रमांक नसलेल्या स्मार्ट कार्डधारक प्रवाशांना सवलतीचा लाभ मिळणार नाही. यासंबंधीची घोषणाच परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे.

मुंबई : एसटी महामंडळाच्या माध्यमातून शासनातर्फे देण्यात येणाऱ्या प्रवासी सवलतीसाठी, स्मार्ट कार्डला आधार कार्ड क्रमांक जोडणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे आधार क्रमांक नसलेल्या स्मार्ट कार्डधारक प्रवाशांना सवलतीचा लाभ मिळणार नाही. यासंबंधीची घोषणाच परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे.एसटी महामंडळाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पुरस्कारप्राप्त खेळाडू अशा २४ सामाजिक घटकांना प्रवासी तिकिटात सवलत मिळते. या सवलतीमुळे सुमारे ३९ कोटी रुपये सरकार एसटी महामंडळाला देते. मात्र, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांचे खोटे ओळखपत्र बनवून,प्रवासी सवलतीचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले. एसटी वाहकांनी संबंधित आगार नियंत्रकाकडे याबाबत तक्रारीही दाखल केल्या आहेत. त्याचबरोबर वाहक आणि बेकायदेशीरपणे सवलत घेणारे प्रवासी यांच्यातील वाद पोलीस ठाण्यात गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. एसटी प्रशासनाकडे ओळखपत्र आणि स्मार्ट कार्डची वैधता तपासण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही.बेकायदेशीर प्रवासी सवलत घेणाºयांना प्रवाशांचा ‘बंदोबस्त’ करण्यासाठी, आधार क्रमांक जोडलेल्या स्मार्ट कार्डला सवलत देण्यात येणार असल्याचा निर्णय रावते यांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांसह अन्य मासिक, त्रैमासिक पासधारकांना स्मार्ट कार्डमुळे आॅनलाइन शुल्क भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधार क्रमांक असलेल्या स्मार्ट कार्डधारकांमुळे लाभार्थी प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.प्रवाशांना मिळणार चार महिन्यांची मुदतआधार क्रमांक स्मार्ट कार्डला जोडण्याच्या निविदा सात दिवसांच्या आत काढण्यात येणार आहेत. निविदा अंतिम झाल्यानंतर, सुमारे चार महिन्यांपर्यंत स्मार्ट कार्डला आधार क्रमांक जोडण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार