शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांच्या जामिनावर १८ डिसेंबरला निर्णय, दीड वर्षाहून अधिक काळ तुरुंगात, जामिनास ईडीचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 05:31 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र सदन घोटाळ््यातील मुख्य आरोपी छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावरील निर्णय विशेष पीएलएमए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट) न्यायालयाने

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र सदन घोटाळ््यातील मुख्य आरोपी छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावरील निर्णय विशेष पीएलएमए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट) न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत राखून ठेवला आहे. दीड वर्षाहून अधिक काळ छगन भुजबळ तुरुंगातच आहेत.भुजबळ मार्च २०१६ तर त्यांचा पुतण्या समीर भुजबळ फेब्रुवारी २०१६ पासून कारागृहात आहेत. यापूर्वीही विशेष न्यायालय व उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला होता. मात्र आठवड्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने मनी लॉड्रिंग अ‍ॅक्टमधील कलम ४५ (१) घटनाबाह्य ठरविल्याने भुजबळांनी पुन्हा एकदा जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला.हे कलम रद्द केल्याने ईडीला भुजबळांचा ताबा मागण्याचा अधिकार नाही. हे राजकीय षड्यंत्र असून त्यांना नाहक यात गोवण्यात आले आहे. गेले २१ महिने ते कारागृहात असून त्यांनी पासपोर्टही पोलिसांकडे जमा केला आहे. त्यामुळे फरार होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. बाहेर पडून निर्दोष असल्याचे सिद्ध करण्याचा त्यांना अधिकार आहे, असे भुजबळांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.तर ईडीच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला. या घोटाळ्यातील दोन आरोपी माफीचे साक्षीदार होण्यास तयार आहेत. मात्र त्यांना धमकाविण्यात आले. भुजबळ कारागृहात असून असे प्रकार घडत असतील तर ते बाहेर आल्यावर काय होईल? साक्षीदारांना धमकाविण्यात येईल. त्यामुळे त्यांची जामिनावर सुटका करू नका, अशी विनंती ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला केली.भुजबळांनी घोटाळ्यातील संपूर्ण रकमेचा हिशेब तपास यंत्रणेला द्यावा, असे वेणेगावकर यांनी सांगितले. विशेष न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून जामीन अर्जावर १८ डिसेंबरला निकाल देऊ, असे सांगितले.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळCourtन्यायालयNCPराष्ट्रवादी काँग्रेस