मुंबई : गोमांस खाण्याची व बाळगण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर येत्या सोमवारी किंवा मंगळवारी निकाल दिला जाईल, असे गुरुवारी उच्च न्यायालयाने जाहीर केले़गोवंश हत्या बंदीनंतर महाराष्ट्रात गोमांस खाणे व बाळगणे यावरही प्रतिबंध घालण्यात आले़ याविरोधात डझनभर याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या़ परराज्यातून गोमांस आणून ते खाण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे़ हा प्रतिबंध आणणे म्हणजे राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारावर गदा आणण्यासारखे आहे, असा दावाही याचिकाकर्त्यांनी केला आहे़ (प्रतिनिधी)
गोमांसाविषयी फैसला पुढच्या आठवड्यात
By admin | Updated: April 24, 2015 01:10 IST