शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

फक्त शेतीवर अवलंबून असणाऱ्यांनाच कर्जमाफी

By admin | Updated: July 17, 2017 02:58 IST

शंभर टक्के शेतीवर उपजीविका असणाऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ज्यांची आर्थिक उलाढाल दहा लाखांच्या वर आहे

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शंभर टक्के शेतीवर उपजीविका असणाऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ज्यांची आर्थिक उलाढाल दहा लाखांच्या वर आहे किंवा जे शेतीशिवाय अन्य नोकरी-धंदा करतात, त्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी स्पष्ट केले, तसेच शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी १५ जिल्ह्यांमध्ये तब्बल चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाचा दुसरा भाग रविवारी प्रसारित करण्यात आला. या वेळी शेती आणि कर्जमाफीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी विस्ताराने उत्तरे देत आपली भूमिका स्पष्ट केली. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने योजना तयार करण्यात आली आहे. त्यातून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये चार हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. शिवाय यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतीची उत्पादकता वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांचे ‘क्लस्टर’ तयार करून त्यांना यांत्रिकीकरणाकरिता सवलत द्यायची आणि लहान शेतकऱ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांच्या भरवशावर बँकिंग व्यवस्था टिकून आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदानासोबतच विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येईल. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज घेता येईल. एक लाखांपर्यंत शून्य टक्के दराने तर एक ते तीन लाखांपर्यंत दोन टक्के दराने पीककर्ज उपलब्ध आहे. यात आणखी सवलत देण्याचा विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. शेतीची उत्पादकता वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, स्वामीनाथन यांनी सांगितलेल्या पद्धतीनेच सध्या देशभर हमीभाव जाहीर केला जातो. मात्र, आपल्याकडे शेतीची उत्पादकता कमी असल्याने आपल्याला हमी परवडत नाही. त्यासाठी खर्च कमी करत शेतीचे उत्पादन वाढविण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्य सरकारने शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. जवळपास ४३ खासगी बाजार सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.कडधान्य नियमनमुक्त करण्याचा विचार-फळे आणि भाजीपाला नियमनमुक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकरी कंपन्या थेट मुंबईच्या बाजारात माल विक्रीस आणतात आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. याच धर्तीवर कडधान्य नियमनमुक्त करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.