शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

आंबेडकर भवनचा वाद धुमसतोय

By admin | Updated: July 4, 2016 02:21 IST

राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश व आनंदराज आंबेडकर यांच्यात खडाजंगी सुरू आहे.

दादर येथील आंबेडकर भवनच्या पुनर्विकासावरून पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे सल्लागार व राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश व आनंदराज आंबेडकर यांच्यात खडाजंगी सुरू आहे. एकीकडे रिपब्लिकन गटातील काही नेते गायकवाड यांचे समर्थन करीत आहेत, तर दुसरीकडे काही नेते आंबेडकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत आहेत. त्यामुळे आंबेडकरी चळवळीचे केंद्रस्थान असलेल्या या वास्तूमुळे चळवळीतील कार्यकर्तेच एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र आहे.मुंबई : आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते, ‘दलित पँथर’ आणि ‘सम्यक क्रांती’ या संघटनांचे प्रवर्तक ज. वि. पवार यांनी आंबेडकर भवन प्रकरणात रत्नाकर गायकवाड यांच्यावर कठोर टीका केली आहे. पवार याबाबत म्हणाले की, रत्नाकर गायकवाड यांचा सामाजिक अथवा राजकीय चळवळींशी काडीमात्र संबंध नाही. तसेच ट्रस्टशीही काही संबंध नाही. मी ट्रस्टचा सल्लागार असल्याचा दावा गायकवाड करत असले तरीही या ट्रस्टमध्ये सल्लागार नावाचे पदच अस्तित्वात नाही; हे मी आवर्जून सांगू इच्छितो. ज्या भवनात चळवळी उभ्या राहिल्या; त्यावर गायकवाड यांनी हातोडा चालवला आहे, हे योग्य नाही. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे एक नाही, तर दोन भूखंड आहेत. परिणामी, एका भूखंडावरील प्रेस पाडण्याची गरजच नव्हती. प्रेसवरील अधिकार हा खासगी आहे; आणि तो प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आहे. ज्या वास्तूमध्ये ऐक्य उभे राहिले, ज्या वास्तूमध्ये चळवळी उभ्या राहिल्या, तीच वास्तू गायकवाड यांनी जमीनदोस्त केली आहे. या वास्तूने उत्तम साहित्यिक दिले आहेत. यात बाबूराव बागूल यांच्यापासून नामदेव ढसाळ यांचा समावेश आहे. शिवाय माझा पहिला लेखही याच प्रेसमधून प्रसिद्ध झाला होता. आता जे जुने ट्रस्टी आहेत; त्यांना काढून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. >‘मुख्यमंत्री गप्प का?’रत्नाकर गायकवाड हे सरकारी पदांचा गैरवापर करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प आहेत. ज्यांनी भवन पाडले त्यांना अटक होत नाही. रत्नाकर गायकवाड यांनी यापूर्वी मोठी पदे भूषवली आहेत. मग तेव्हा एखादे आंबेडकर भवन उभे करावे, असे त्यांना का वाटले नाही? भवनाच्या भूखंडाची बाजारभावानुसार किंमत सुमारे ५०० कोटी एवढी आहे. गायकवाड यांना या भूखंडावर ‘व्यावसायिक संकुल’ उभे करण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे. >तर न्यायालयाचे दरवाजे खुले’ जरी या ठिकाणी दोन भूखंड असले तरी त्यावरील मालकी हक्क ट्रस्टचाच आहे. जे या भूखंडावर मालकी हक्क सांगत आहेत, त्यांना यापूर्वीच तशी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन ट्रस्टने केले होते. मात्र अशी कोणतीही कागदपत्रे समोर आली नाहीत. यापुढेही ज्यांच्याकडे कागदपत्रे असतील, त्यांच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे खुले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी नायगावहून या ठिकाणी हलवलेली प्रेस भाडेतत्त्वावर सुरू होती. १९३० साली खरेदी केलेली प्रेसची मशीन यापूर्वीच त्यांच्या वारसांकडून भंगारात विकण्यात आली आहे. त्यामुळे बाबासाहेबांचा वारसा नष्ट करण्याचे होणारे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावाही रत्नाकर गायकवाड यांनी केला.