शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

मंदा म्हात्रे व तुकाराम मुंढे यांच्यात पुन्हा वाद

By admin | Updated: August 23, 2016 02:29 IST

बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सोमवारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली.

नवी मुंबई : बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सोमवारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. दुसऱ्या भेटीतही आयुक्तांनी सन्मानपूर्वक वागणूक न दिल्याची प्रतिक्रिया आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली. गणेशोत्सव मंडळांना कमानी बांधण्याची परवानगी दिली जावी, पाणीपुरवठा संदर्भातील नागरिकांच्या समस्या सोडवाव्या तसेच धूळखात पडलेले पालिकेचे रुग्णालयही लवकरात लवकर सुरु करण्यात या तीन प्रमुख मागण्यांसाठी आयुक्तांची भेट घेतल्याची माहिती मंदा म्हात्रे यांनी बेलापूर येथील पत्रकार परिषदेत दिली. लोकप्रतिनिधींना महापालिका आयुक्तांनी सन्मानपूर्वक वागणूक देणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया म्हात्रे यांनी व्यक्त केली. गणेशोत्सवाला अवघे काहीच दिवस उरले असताना गणेश मंडळांना कमानी बांधण्याची परवानगी दिली जावी, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने सर्वच विभागातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. नवी मुंबईकरांना मुबलक व उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्याची गरज आहे. महापालिकेचे रुग्णालय बांधून तयार आहेत मात्र अजूनही आरोग्याच्या सेवा पुरविल्या जात नाही. या इमारती धूळ खात पडल्या आहेत असेही म्हात्रे यांनी सांगितले. बेलापूर रुग्णालयाकरिता आमदार निधी तर वाशीतील रुग्णालयाला रुग्णवाहिका देण्यात आली.महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला असून आयुक्तांकडून योग्य वागणूक दिली जात नसल्याची तक्रार अधिकारी वर्गाने केल्याची माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितली. सफाई कामगारांना वेळेवर पगार दिला जात नाही कंत्राटदाराला महापालिकेकडून वेळीच मोबदला न मिळाल्याने कामगारांचीही फरफट होत असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. महापालिकेच्या ईटीसी केंद्राबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीची मागणी करण्यात आल्याची माहितीही यावेळी म्हात्रे यांनी दिली. (प्रतिनिधी)>मंदा म्हात्रेंना आयुक्तांनी खोटे ठरविलेमहापालिका आयुक्तांना ईटीसी केंद्राच्या चौकशीची मागणी करत असताना केंद्राला अद्यापही महापालिकेचे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही. ईटीसी केंद्राच्या एका भागात अनधिकृतपणे पत्र्याची शेड उभारण्यात आले आहेत, खाजगी संस्थांना काही खोल्या वापरण्यासाठी देण्यात आल्या, अनावश्यक विजेचा वापर आदी बाबी मंदा म्हात्रे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणल्या. यावेळी तुम्ही दिलेली माहिती ही खरी कशी असे म्हणत आयुक्त मुंढे यांनी आमदार मंदा म्हात्रे यांना खोटे ठरवले. कायद्यानुसार सीएसआरवरील संचालिका अतिरिक्त आयुक्त नाहीत, शहरात नागरी सुविधांची काय कामे केली, जोपर्यंत ईटीसी केंद्राची चौकशी केली जात नाही तोपर्यंत पदावरील व्यक्तींना निलंबित करा.>ईटीसीची चौकशी झालीच पाहिजेमहापालिकेच्या ईटीसी केंद्राची चौकशी करण्याबाबतची मागणी मंदा म्हात्रे यांनी केली. अपंग केंद्रात महापालिका क्षेत्रातील किती विद्यार्थी आहेत, सीएसआरच्या प्रमुख पद निर्माण नसतानाही त्यांची नियुक्ती कोणत्या आधारे करण्यात आली, बजेटमध्ये जाहिरात आणि पाहुणे यांच्यासाठी खर्चाबाबतची माहिती देण्यात यावी अशा मागण्याही म्हात्रे यांनी केल्या.