शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

युवक-युवतीच्या मृत्यूचे गूढ कायम

By admin | Updated: April 5, 2017 01:26 IST

लोणावळा दुहेरी हत्याकांडातील महाविद्यालयीन युवक व युवती यांचा खून हा डोक्यात गंभीर मार लागल्याने झाला

लोणावळा : लोणावळा दुहेरी हत्याकांडातील महाविद्यालयीन युवक व युवती यांचा खून हा डोक्यात गंभीर मार लागल्याने झाला असल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे, अशी माहिती तपास अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी दिली. या अहवालानुसार सदर मयत मुलीसोबत कसलाही लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे या अहवालात स्पष्ट झाले असल्याचे त्यांनी सांगितले.आयएनएस शिवाजी ते एअर फोर्स दरम्यानच्या एस पॉइंट या ठिकाणी सिंहगड महाविद्यालयातील मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्गात शिकणारा सार्थक दिलीप वाकचौरे (वय २२, रा. चणेगाव रोड, सात्रळ, राहुरी सोनगाव, जिल्हा अहमदनगर) व सिंहगड विद्यालयातच संगणकीय इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्गात शिकणारी श्रुती संजय डुंबरे (वय २१, रा. गेस्ट हाऊस ओतुरजवळ, ता. जुन्नर, जि. पुणे) या युवक व युवतीचा मृतदेह आढळला होता. आज सकाळी पुण्यातील ससून रुग्णालयात मयत श्रुती व सार्थक यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. यामध्ये दोघांचाही मृत्यू हा डोक्यात गंभीर मार लागला असल्याने झाला असल्याचे समोर आले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अपर अधीक्षक राजकुमार शिंदे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथारे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राम जाधव, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील यांनी घटनास्थळी काही मागोवा मिळतो का याची पडताळणी केली. श्वानपथक, फिंगर प्रिंट पथकाच्या साहाय्याने परिसर पिंजून काढला. तसेच आठ वेगवेगळी पथके तयार करून घटनेचा तपास सुरू केला आहे. (वार्ताहर)सार्थक हा मनमिळाऊ, तर श्रुती ही टॉपर विद्यार्थिनीसार्थक वाकचौरे हा सिंहगड महाविद्यालयातील हरहुन्नरी विद्यार्थी होता. महाविद्यालयात कोणताही कार्यक्रम असला, तर सार्थक हा आघाडीवर असायचा, असे सार्थकचा रूममेट आशिष दाभाडे याने लोकमतशी बोलताना सांगितले. श्रुती ही टॉपर विद्यार्थिनी होती. मागील तीन ते चार वर्षांपासून ते दोघे चांगले मित्र होते व दोघेही मनमिळाऊ होते, असे त्यांच्या मित्रांनी सांगितले.