मार्गासनी : तोरणा किल्ला (ता. वेल्हे) चढताना शिवज्योत आण्यासाठी गुरुवारी (दि. १८) रात्री ९ च्या सुमारास शंकर महादेव गायकवाड (वय २५, रा. मोरघर, ता. जावळी, जि. सातारा) येथील युवकाचा तटावरून पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी; मोरघर येथील वायुदळ ग्रुपची मुले शिवजयंतीनिमित्त शिवज्योत तोरणा किल्ल्यावरून आणण्यासाठी गुरुवारी ४० मुले एका ट्रकने तोरणागडाच्या पायथ्याला आली होती. ग्रुप-ग्रुपने किल्ला चढत होते. एका ग्रुपमध्ये पाठीमागे असणाऱ्या शंकरचा तटावरून पाय घसरून किल्ल्याच्या उत्तर दिशेस खोल दरीत पडल्यामुळे डोक्याला मार लागल्याने रक्तस्राव झाला. त्याला रुग्यालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (वार्ताहर)
तोरणा किल्ला चढताना युवकाचा मृत्यू
By admin | Updated: February 20, 2016 01:02 IST