शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दोन नक्षलवाद्यांचा खात्मा; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 02:06 IST

गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी पोलिसांना वॉन्टेड असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरातून शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली.

चंद्रपूर/ गोंदिया : गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी पोलिसांना वॉन्टेड असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरातून शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली. तर मध्यप्रदेश, छत्तीसगड व गोंदिया या परिसरासाठी नक्षलवाद्यांच्या प्लाटून नं. ५५ च्या डेप्युटी कंमाडर व एक सदस्य अशा दोघांचा छत्तीसगडच्या राजनांदगाव पोलिसांनी सकाळीच झालेल्या चकमकीत खात्मा केला. त्यांच्यावर १० लाखांचे बक्षीस होते.विनोद उर्फ दावेन सेरकुराम कोरेटी (२६) व सागर (२८), अशी मृत नक्षल्यांची नावे आहेत. तर रामन्ना आणि पद्मा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अटक केलेल्या दोन्ही नक्षलवाद्यांवर लाहेरी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. हे दोघे बल्लारपुरात असल्याची गोपनीय माहिती नक्षल सेलच्या पथकाला मिळाली होती. यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षल सेलचे पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र मडावी यांनी आपल्या ताफ्यासह सर्च मोहीम राबविली. बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरात रामन्ना आणि पद्मा संशयितरित्या फिरताना आढळले.तांत्रिक बाबी सांभाळायचा रामन्नाअटक केलेला रामन्ना हा दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा मेंबर असून त्याला पकडून देण्यासाठी २५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तर पद्मा ही एरीया कमिटीची मेंबर आहे. तिच्यावर सहा लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. रामन्ना हा मूळचा हैदराबाद राज्यातील असून नक्षल चळवळीत तो तांत्रिक बाबी सांभाळायचा, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दिली.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी