शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लयभास्कर, तालकंठमणि खाप्रुमामा यांची पुण्यतिथी

By admin | Updated: September 3, 2016 10:29 IST

लयभास्कर, तालकंठमणि मा.लक्ष्मण पर्वतकर उर्फ खाप्रुमामा यांची आज (३ सप्टेंबर) पुण्यतिथी

संजीव वेलणकर
पुणे, दि. ३ - लयभास्कर, तालकंठमणि  मा.लक्ष्मण पर्वतकर उर्फ खाप्रुमामा यांची आज (३ सप्टेंबर) पुण्यतिथी.  मा.खाप्रुमामा ना त्यांची आई 'खाप्रु' असे म्हणत व तेच नाव पुढे रुढ झाले. त्यांनी संगीताचे प्रारंभिक धडे त्यांचे काका सारंगीवादक रघुवीर पर्वतकर यांचेकडुन व तबल्याचे शिक्षण चुलते हरिश्चंद्र पर्वतकर यांच्याकडून घेतले. तसेच पखवाजाचे धडे आपल्या चुलत भावाकडुन घेतले. खाप्रुजींना लयकारीची दैवी देणगी होती. दिलेल्या लयीच्या कितीहीपट लय ते वाजवून दाखवू शकत असत. तसेच एखादा तालाचा ठेका धरुन त्याची कितिही भागात विभागणी करणेहि त्यांना जमत असे. त्यांचे काही ध्वनीमुद्रण त्या काळात प्रकाशित झाले होते, १९१९ साली पं. विष्णु पलुस्कर यांनी आयोजीत केलेल्या संगीत संमेलनात त्यांनी आपली कला त्या काळच्या अग्रगण्य संगीतकारांसमोर सादर केली. त्यांच्या अद्वितीय लयकारीमुळे अनेक दिग्गज संगीतकारांनी त्यांची प्रशंसा केली. १९३९ साली संगीतसम्राट अल्लादियाखाँ यांनी त्यांना एका समारंभात सन्मानपूर्वक 'लयभास्कर' हि पदवी दिली. तसेच गोव्यातील रसिकांकडून त्याना 'तालकंठमणि' हि पदवी देण्यात आली. त्यांना तबला, पखवाजाबरोबरच सारंगीवादन व गायन पण येत असे. त्यांनी आपले उर्वरीत आयुष्य तबला, ताल व लयशास्त्र ह्यात घालविले. लयीच्या अद्भुत दैवी देणगीमुळे ते एकाच वेळी पाच वेगवेगळ्या तालांचा ठेके धरुन त्यांना एकाच वेळी समेवर आणू शकत. उदा. डाव्या हाताने त्रिताल (१६ मात्रा), उजव्या पायाने झपताल (१० मात्रा), उजव्या हाताने धमार (१४ मात्रा), डाव्या पायाने चौताल (१२ मात्रा) व तोंडाने सवारी (१५ मात्रा) असे पाच तालाचे ठेके धरुन समेवर आणणे त्यांना सहज जमत असे. त्यांनी अनेक नविन तालांची निर्मिती केली. त्यातला त्यांच्या खास आवडीचा म्हणजे 'परब्रह्मताल' (१५.७५ पावणेसोळा मात्रा). लय त्यांच्या जीवनात इतकी भिनली होती की झोपेतसुद्धा त्यांचे हात लयीत हलत असत. मा.लक्ष्मण पर्वतकर यांचे ३ सप्टेंबर १९५३ रोजी निधन झाले. लोकमत समूहातर्फे मा.लक्ष्मण पर्वतकर यांना आदरांजली.