शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

अंकुर पनवारला फाशीची शिक्षा

By admin | Updated: September 9, 2016 05:48 IST

एकतर्फी प्रेमातून आणि आकसापोटी हरियाणाच्या प्रीती राठीवर अ‍ॅसिडहल्ला करून तिला ठार मारणारा तिचा शेजारी अंकुरलाल पनवार याला गुरुवारी विशेष महिला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली

मुंबई : एकतर्फी प्रेमातून आणि आकसापोटी हरियाणाच्या प्रीती राठीवर अ‍ॅसिडहल्ला करून तिला ठार मारणारा तिचा शेजारी अंकुरलाल पनवार याला गुरुवारी विशेष महिला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. अ‍ॅसिडहल्ला प्रकरणी देशातील ही पहिलीच फाशीची शिक्षा आहे. प्रीती राठीवर २ मे २०१३ रोजी वांद्रे टर्मिनसवर अ‍ॅसिडहल्ला झाला होता. अनेक अवयव निकामी झाल्याने १ जून २०१३ रोजी प्रीतीचा मृत्यू झाला. विशेष महिला न्यायालयाच्या न्या. ए. एस. शेंडे यांनी मंगळवारी अंकुर पनवार (२६) यास भारतीय दंडसंहिता कलम ३०२ (हत्या) व ३२६ (ब) (अ‍ॅसिड फेकणे) अंतर्गत दोषी ठरवले होते. गुरुवारी न्या. शेंडे यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत अंकुरला याच कलमांतर्गत फाशीची शिक्षा ठोठावली. पनवारला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर या निकालावर उच्च न्यायालयात अपिलात जाण्यासाठी न्या. शेंडे यांनी त्याला एका महिन्याची मुदत दिली. मुंबई पोलिसांनी पनवारवर तब्बल १,३३२ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. तर सरकारी वकिलांनी खटल्यादरम्यान ३७ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. साक्षीदारांमध्ये तिचे वडील अमरसिंग राठी यांचाही समावेश होता. दरम्यान, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाने राज्य सरकारला प्रीती राठीच्या पालकांना २ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले. तसेच अंत्यसंस्कारांचा खर्च म्हणून २ हजार रुपये देण्याचेही निर्देश दिले.अ‍ॅसिडहल्ल्याप्रकरणी प्रथमच फाशीदिल्लीच्या निर्भया केसनंतर आयपीसीमध्ये सुधारणा करण्यात आली. त्यात महिलांवर क्रूरपणे अ‍ॅसिडहल्ला करणाऱ्या नराधमांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करण्यात आली. याच तरतुदीच्या आधारावर गुरुवारी विशेष महिला न्यायालयाच्या न्या. ए. एस. शेंडे यांनी अंकुर पनवारला फाशीची शिक्षा ठोठावली. देशातील ही पहिलीच केस आहे.विकृत मानसिकतेच्या लोकांवर जरब बसेलअंकुरसारख्या विकृत मानसिकतेच्या लोकांवर या निर्णयामुळे जरब बसेल. भारतात महिलांची तुलना देवीशी करण्यात येते. मात्र तिच्यावरच अत्याचार करण्यात येतो. आता यापुढे अशा प्रकारचे अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, हा संदेश या निकालामुळे जनमानसात पोहोचेल. निर्भया केसनंतर आयपीसीमध्ये सुधारणा करण्यात आली. त्यात अ‍ॅसिडहल्ला करणाऱ्यांनाही फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार दोषीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याची ही पहिलीच केस आहे.- अ‍ॅड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील पनवार-प्रीतीचा भाऊ कोर्टातच भिडलेपनवारला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली तेव्हा तो कमालीचा घाबरला. त्यानंतर रागाने जागेवरून उठत ही केस सीबीआयकडे वर्ग करा, असे मी वारंवार सांगत असल्याचे तो म्हणाला. तथापि, न्यायालयाने शिक्षेला एक वर्षाची स्थगिती दिल्यानंतर अंकुरच्या चेहऱ्यावरचा तणाव काही प्रमाणात दूर झाला. न्यायाधीश उठून चेंबरमध्ये गेल्यानंतर मात्र तो हसू लागला. त्याचे हसणे पाहून प्रीतीचा चुलत भाऊ हितेश वैतागला. ‘अभी हसले बाद मे तू बचेगा नहीं,’ असे हितेश म्हणाला. मात्र पनवारने त्याला आरोपीच्या पिंजऱ्यातून उभे राहत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिव्या ऐकून हितेश पनवारवर धावून गेला आणि त्यास मारहाण केली. तेवढ्यात पोलीस धावून आले त्यांनी हितेशच्या कानशिलात लगावली आणि त्याला दूर केल