शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 15:38 IST

ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन झालं आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ठळक मुद्देज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन झालं आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.कवयित्री शिरीष पै आचार्य अत्रे यांची कन्या होत.

मुंबई, दि. 2- ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन झालं आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कवयित्री शिरीष पै आचार्य अत्रे यांची कन्या होत. कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्म, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व क्षेत्रात त्यांनी लिखाण केलं आहे.  शिरीष पै यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला. एक तारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र इत्यादी त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. मराठी कवितेत जपानी हायकू हा प्रकार रूजविण्याचा श्रेय शिरीष पै यांना जातं

त्यांच्या घरातच साहित्य विविध अंगानी मुक्तपणे संचार करीत होतं. हे बाळकडू त्यांना बालपणापासून मिळत होतं. साहित्य विचाराचे संस्कार त्यांच्यावर आजूबाजूच्या वातावरणामुळे सतत होत असले तरी शिरीष पै यांची स्वतःची अशी एक शैली होती. त्यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रसन्न शैलीतील ललित लेखिकेने वाचकांना आनंद दिला. 

लालन बैरागीण, हे ही दिवस जातील या कादंबऱ्यांचं लिखाण त्यांनी केलं. छोट्या मुलांसाठी आईची गाणी, बागेतल्या जमती या बाल साहित्याची निर्मिती केली तर चैत्रपालवी खडकचाफा, सुखस्वप्न, कांचनबहार हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. शिवाय हा खेळ सावल्यांचा, झपाटलेली, कळी एकदा फुलली होती ही त्यांनी लिहिलेली नाटकं. ललित साहित्याची त्यांची पुस्तकंही गाजली. आजचा दिवस, आतला आवाज, प्रियजन, अनुभवांती, सय मी माझे मला ही त्यांची ललित साहित्य आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. 

वडिलांकडून मिळाला लेखनाचा वारसावडील आचार्य अत्रे यांच्याकडून लेखनाचा वारसा शिरीष पै यांना मिळाला. मुंबईला लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना त्या ‘नवयुग’च्या कार्यालयात जाऊन बसायचा. त्या वेळी नवयुगमध्ये प्रसिद्ध लेखिका शांताबाई शेळके आचार्य अत्रे यांना मदत करायच्या. काही कारणांमुळे शांताबाईंनी ‘नवयुग’ सोडलं. त्यावेळी शांताबाई शेळके यांच्या सारखी लिखाण करणारी दुसरी व्यक्ती मिळत नसल्याने शांताबाईंचं काम मी पाहू का? असं शिरीष पै यांनी आचार्य अत्रे यांना विचारलं होतं. वडिलांचा होकार मिळताच शिरीष पै यांनी ‘नवयुग’चं काम सुरू केलं. लिहायची सवय त्यांना तेव्हापासून लागली.

‘लिहीत राहा..’ १६व्या वर्षी शिरीष पै यांची कथा प्रसिद्ध झाली ती भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नौखालीमध्ये जे अत्याचार घडले त्यावर आधारित होती. ‘नवशक्ती’चे त्या वेळचे संपादक प्रभाकर पाध्ये यांना ती कथा आवडली. नंतर  सर्व साहित्याचे ते एक मोठे वाचक बनले. शिरीष पै यांना लहानपणापासून कवितेची, कथेची आवड. मॅट्रिकला असताना त्या संस्कृत शिकत होत्या. संस्कृत विषय त्यांचा उत्तम होता. त्यावेळी मुंबई विद्यापीठात मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळाला होता. बी.ए.चं शिक्षण घेत असताना त्यांना मराठी घ्यायचं होतं. पण त्यांच्या वडिलांनी म्हणजेच आचार्य अत्रे यांनी अर्थशात्र घ्यायला लावलं. त्या वेळी आचार्य अत्रे ‘नवयुग’चे संपादक होते आणि शांताबाई शेळके नवयुग सोडून गेल्या होत्या. त्याप्रसंगी आचार्य अत्रे यांनी शिरीष पै यांना ‘आता तूच काम सुरू कर, असं सांगितलं होतं. १०० रुपये पगारावर शिरीष पै यांची नेमणूक झाली होती.  

चित्रपट परीक्षण सुरू केलंलिखाणाचं काम सुरू असताना शिरीष पै यांनी सिनेमांचं परीक्षणही केलं.  अभिनेत्री नर्गीसची मुलाखत, राज कपूर यांची मुलाखत, बलराज सहानीची मुलाखत, वसंत देसाईंची मुलाखत अशा मुलाखती गाजत राहिल्या. तेव्हा नवयुग’चे सहसंपादक दत्तू बांदेकर होते. त्यांनी शिरीष पै यांना लिखाणाची खूप संधी दिली तसंच खूप प्रोत्साहन दिलं. १९५३ ते १९६१ हा शिरीष पै यांचा ‘नवयुग’मधला सुवर्णकाळ होता.