शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : ‘त्या’ वृद्धाचा मृत्यू कोरोनामुळे नाही; तपासणी अहवाल ’निगेटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 16:03 IST

नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू तपासणी प्रयोगशाळेचा अहवाल कोरोना बाबत ‘निगेटिव्ह’ आला आहे.

ठळक मुद्देतपासणी प्रयोगशाळेचा अहवाल कोरोना बाबत ‘निगेटिव्ह’ आला आहे. ना कोरोनाची लागन झाली नव्हती, असे डॉक्टर प्रेमचंद पंडित यांनी सांगितले.

बुलडाणा : कोरोनासदृश लक्षणे आढळून आल्यानंतर शनिवारी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दगावलेल्या वृद्धाचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला नसल्याचे रविवारी प्राप्त झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. सदर वृद्धाचा नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू तपासणी प्रयोगशाळेचा अहवाल कोरोना बाबत ‘निगेटिव्ह’ आला आहे. त्यामुळे बुलडाणा  जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही,असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित यांनी स्पष्ट केले. शनिवारी सौदी अरेबियातून आलेल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.सदर वृद्ध हे चिखली तालुक्यातील असून, ते शुक्रवारी सौदी अरेबिया येथून परत आले होते. ताप आणि सर्दीची लक्षणे आढळल्यामुळे त्यांना आधी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; परंतु कोरोनासदृश लक्षणे आढळल्यामुळे त्यांना शनिवारी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात खबरदारीच्या दृष्टिकोनातून ठेवण्यात आले होते. सदर वृद्ध व्यक्तीस आधीपासूनच मधुमेह व इतर आजार असल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना, सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या रुग्णाचे नमुने हे नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आले होते. रविवारी या रुग्णाच्या स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यांना कोरोनाची लागन झाली नव्हती, असे त्या अहवालात नमुद असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित यांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbuldhanaबुलडाणा